युरोपमधील अनेक देशांमध्ये अचानक ब्लॅकआऊट झाले आहे. स्पेन आणि पोर्तुगालसह अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्यामुळे हवाई सेवांपासून ते मेट्रोपर्यंतचे कामकाज ठप्प झाले आहे. आज भर दुपारी मॅड्रिडपासून लिस्बनपर्यंत ठिकठिकाणी अंधार झाला. यामुळे अनेक देशांनी तातडीने आपत्कालीन प्रोटोकॉल लागू केले आहेत. हा वीज पुरवठा खंडीत होण्यामागे सायबर हल्ला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून तातडीने वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.