आयपीएल 2025 मधील 47 व्या सामन्यात स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात युवा 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी याने इतिहास घडवला आहे. वैभवने सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर येथे गुजरात टायटन्स विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना ऐतिहासिक शतक केलं आहे. वैभवने या तकासह अनेक विक्रम रचले आहेत. वैभव आयपीएल इतिहासात शतक करणारा सर्वात युवा आणि पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तसेच वैभवने या शतकासह अनेक विक्रम केले आहेत.