Maharashtra News Live Updates : देशातील पहिलं आधारकार्ड धारक आदिवासी महिलेला तब्बल नऊ महिन्यांनी मिळाला भारतीय बहीण योजनेचा लाभ
Saam TV April 29, 2025 09:45 PM
देशातील पहिलं आधारकार्ड धारक आदिवासी महिलेला तब्बल नऊ महिन्यांनी मिळाला भारतीय बहीण योजनेचा लाभ

देशातील पहिला आधार कार्ड देऊन गौरवण्यात आलेल्या आदिवासी महिलेला लाडकी बहीण योजनेसाठी मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली गावात राहणाऱ्या आदिवासी महिलेला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हस्ते पहिलं आधार कार्ड देऊन आधार कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता मात्र त्याच महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात फिरफिर करावी लागली आहे

पोलीस उपनिरीक्षक रंजीत कासलेला छत्रपती संभाजीनगरच्या हरसुल जिल्हा कारागृहात हलवले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड सध्या बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये असून त्याच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलेले बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक न्यायालयाने कोठडी मध्ये असलेले रणजीत कासले याला सुरक्षेच्या कारणावरून बीड जिल्हा कारागृहामध्ये छत्रपती संभाजी नगरच्या हरसुल कारागृहामध्ये हलवण्यात आले आहे

लातूर मनपाच्या इतिहासात यंदा सर्वाधिक करवसूली मनपाच्या तिजोरीत 80 कोटीचा भरणा

लातूर महानगरपालिकेने यंदा सर्वाधिक कर वसुली केली आहे.. मनपाच्या तिजोरीत यंदा तब्बल 80 कोटीची जोरदार वसुली केली आहे..गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमालीची कर वसुली झाल्याने महापालिकेच्या वतीने शहरवासीयांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये देखील वाढ होणार आहे.

नाशिकच्या मालेगाव मध्ये तापमानाचा पारा आज पुन्हा 43 अंशाच्या पुढे गेला आहे

रोज तापमान कमी जास्त होत असले तरी ते सातत्याने 42 अंशाच्या पुढे जात असताना आज तापमान पुन्हा 43.2 अंशावर गेले,सकाळ पासूनच तापमानाचा पारा हळू हळू वाढू लागत असल्याने कामासाठी बाहेर पडणाऱ्या उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे

जालन्यात 29 लाखांचा 85 किलो गांजा जप्त, तीन संशयित आरोपी जेरबंद

जालन्यात 29 लाखांचा 85 किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी शाखेच्या पोलिसांनी जप्त केलाय. एका चार चाकी वाहनातून 85 किलो गांजा विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर कारवाई करत पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केल आहे.

Nashik News: नाशिकच्या नांदगाव तालुक्यात ८ गावं, वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा

नाशिकच्या नांदगाव तालुक्यात ८ गावं, वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा

नाशिकच्या नांदगाव तालूक्यात पाणी टंचाई झळा बसू लागल्या

तालूक्यातील आठ गावे व वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर सुरु करण्यात आले आहे.

मागील वर्षी जिल्ह्यात सर्वाधिक ७७ टँकर सुरु होते नव्याने पुन्हा अकरा गावे व वाड्यावस्त्यांसाठीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे.

मागील वर्षी चांगला पासून झाल्याने यंदा एप्रिल च्या दुस-या आठवड्या पासून पाण्याचे टँकर सुरु करण्यात आले आहे.

Amravati News: अमरावतीत रात्री 8 ते 2 वाजेपर्यंत सर्वाधिक वीजपुरवठा खंडित

अमरावती -

अमरावतीत रात्री 8 ते 2 वाजेपर्यंत सर्वाधिक वीजपुरवठा खंडित

दरदिवशी 300 तक्रारी

विजेच्या वाढत्या मागणीमुळे महावितरणच्या यंत्रणेवर वाढला ताण

कमी अधिक दाबाने कुलर किंवा एसी उपकरणे चालवणे झाले अवघड

तापमानात वाढ झाल्याने कुलर आणि एसी सर्वाधिक लावले जात आहे त्यामुळे विजेच्या दाबावर त्याचा परिणाम होत आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.