Maharashtra Live Update : PM मोदी अन् शहांच्या उपस्थितीत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक!
Sarkarnama April 29, 2025 09:45 PM
Cabinet Meeting : केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक!

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने बैठकांचा धडाका लावला आहे. अशातच आज केंद्रीय मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक पार पडणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीत केंद्र सरकार पाक विरोधात काही मोठा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Mumbai Police : मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर उद्या नित्वृत होणार

मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर हे उद्या ३० एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे आता फणसळकर यांच्यानंतर पुढील पोलिस आयुक्त कोण असणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलिस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावांची चर्चा सध्या सुरू आहे.

Nashik Congress : नाशिकमध्ये आज काँग्रेसची सद्भावना रॅली

काँग्रेसकडून आज नाशिकमध्ये सद्भावना रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार यांच्यासह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. नाशिकमध्ये दर्गा काढण्यावरून झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर काँग्रेसकडून या रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

Pune Police : पुण्यातून 28 लाखांच्या बनावट नोटा जप्त

पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 28 लाख रूपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.

Mumbai Fire : वांद्रे परिसरातील क्रोमा इलेक्ट्रॉनिक शोरुमला भीषण आग

मुंबईत काल एक मोठी आगीची घटना घडली होती. त्यानंतर आज आणखी एक आगीची घटना समोर आली आहे. वांद्रे परिसरातील क्रोमा इलेक्ट्रॉनिक शोरुमला आज भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आगीच्या जळून खाक झाले आहे. तर घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

India Vs Pakistan: काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार

पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमधील संबंध ताणले आहेत. अशातच आता पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा सीमारेषेवर गोळीबार केल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे. कुपवाडा, बारामुल्ला आणि अखनूर या सेक्टरमध्ये हा गोळीबार झाला. या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून जशास तसं प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.