Akshaya Tritiya : पितरांच्या पूजेसाठी बदाम आंब्याला पसंती
esakal April 29, 2025 11:45 PM

येसगाव- अक्षय तृतीया हा असा दिवस आहे की त्याला कधीही क्षय न होणारे पुण्य मिळते असा विश्वास आहे. या दिवशी पितृपूजा आणि तर्पणाने पितरांची कृपा लाभते. घरात सुख शांती आणि समृद्धी लाभते. त्यांचा आशीर्वाद अखंड लाभतो अशी श्रद्धा आहे.

अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्यामुळे या दिवसाला महत्त्व आहे. या भावनेमुळे सोने, चांदी, वाहन खरेदीसाठी महत्त्व असल्याने व्यावसायिक सज्ज झाले आहेत. पुढील महिन्यात लग्नसराई तेजीत असल्याने वधू-वर व कुटुंब यासाठी लागणारे दाग- दागिने, पोशाख अन्य साहित्य खरेदी अक्षय तृतीयेला होणार आहे. पितरांच्या पूजेसाठी बाजारपेठेत बदाम आंब्याची रेलचेल दिसून येत आहे.

आंब्याचा पाला पूजेसाठी अत्यंत शुभ मानले जाते. पितरांना आंब्याच्या रसाचा नैवेद्य दिल्यानंतर अनेक जण आंब्याचा रस खाण्यास सुरवात करतात. याच दिवशी गौराईचा उत्सव होतो. चना डाळ, ८०रुपये, साखर ४३, रुपये, गूळ ५० रुपये, व दूध ६० रुपये लिटर आहे, आर्थिक परिस्थितीनुसार सर्वसामान्यांना सण साजरा करावा लागेल. बाजारात आंब्यांचा पूर उन्हाळ्यातील सर्वात आवडते फळ म्हणून.फळांचा राजा आंबा ओळखला जातो अक्षय तृतीयेसाठी हजारो क्विंटल आंबा बाजारात दाखल झाला आहे शेकडो हातगाड्यांवर आंबे विक्री केली जात आहे.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा आंब्याचे भाव स्थिर आहेत. आहेत. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर बदाम आंब्याला ग्राहकांची जास्त मागणी असते.. गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, विजयवाडा आदि भाग भागातून आंबे येत असून शहरी व ग्रामीण भागात सणासाठी मोठी मागणी. आहे. यानंतर आंब्याचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.

- चंद्रभान शेलार, आंबा विक्रेता, येसगाव खुर्द

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.