Vaibhav Suryavanshi century as debate brews over Gill’s comment
१४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने मधील गुजरात टायटन्सविरुद्धचा सोमवारचा सामना गाजवावा. त्याने ३८ चेंडूंत ७ चौकार व ११ षटकारांसह १०१ धावांची खेळी करून RR ला विजय मिळवून दिला. GT च्या ४ बाद २०९ धावांचा RR ने १५.५ षटकांत २ बाद २१२ धावा केल्या. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने सोमवारी वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीवर दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. गिलने सामन्यानंतर म्हणाला, आजचा दिवस सूर्यवंशीचा होता, नशीब त्याच्या बाजूने होतं.
"तो त्याचा दिवस होता. नशीब त्याच्या बाजूने होते. त्याची फलंदाजी जबरदस्त होती आणि त्याने त्याच्या दिवसाचा पूर्ण फायदा घेतला," असे गिलने सामन्यानंतर सांगितले. मात्र, भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजाला गिलचे हे विधान आवडले नाही. सूर्यवंशीच्या अविश्वसनीय खेळीला नशिबाचं लेबल लावणे, जडेजाला मान्य नाही.
"१४ वर्षांच्या मुलाने स्वतःवर विश्वास ठेवला, इतका आत्मविश्वास त्याच्यात आहे आणि त्याने ते खेळातून दाखवून दिले. मग, कोणीही टीव्हीवर म्हणत असेल की हा फक्त त्याचा नशीबाचा दिवस होता, ते योग्य नाही," असे जडेजाने जिओस्टारशी बोलताना सांगितले.
"आपण सर्वांनी क्रिकेट खेळले आहे, आपण क्रिकेटबद्दल काही स्वप्ने पाहिली आहेत, मग ती आपल्या ड्रॉइंग रूममध्ये असो किंवा मित्रांसोबत खेळताना. १४ आणि १५ व्या वर्षी आपण सगळ्यांनी वेगवेगळी स्वप्ने पाहिली असतील. वैभवने तिथे जाऊन ते स्वप्न जगलं आहे. त्याच्यात ताकद आहे," असे अजय जडेजा म्हणाला.
दरम्यान, कालच्या सामन्यात विजय मिळवूनही प्ले ऑफ खेळतील याची गॅरंटी नाही. काल शुभमन गिल ( ८४) व दॉस बटलर ( ५०) यांच्या अर्धशतकासह साई सुदर्शनच्या ३९ धावांच्या जोरावर गुजरातने ४ बाद २०९ धावा केल्या. वैभवने ३५ चेंडूंत शतक पूर्ण करून इतिहास रचला.. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वेगवान शतकाचा विक्रम वैभवच्या नावे नोंदवला गेला. त्याने ३८ चेंडूंत १०१ धावा करताना यशस्वी जैस्वालसह १६६ धावांची भागीदारी केली. यशस्वीने ४० चेंडूंत ७० धावांची नाबाद खेळी केली, कर्णधार रियान परागनेही १५ चेंडूंत नाबाद ३२ धावा केल्या. राजस्थानने ८ विकेट्स राखून हा सामना जिंकला.