उन्हाळ्यात हेअर स्पा करताना काही गोष्टी ठेवा लक्षात, चुकूनही करू नका ‘या’ चुका
GH News May 01, 2025 01:06 AM

केस मऊ, रेशमी, लांब आणि सुंदर बनवण्यासाठी आपण हेअर स्पाची मदत घेतो. केस सुंदर बनवण्यासोबतच, हेअर स्पा केसांना निरोगी ठेवण्यास देखील मदत करते. म्हणूनच बहुतेक लोकं नियमितपणे त्यांच्या केसांची काळजी घेण्याच्या दिनचर्येत हेअर स्पाचा समावेश करतात. खरं तर, हेअर स्पा केल्याने केस मऊ, रेशमी होतात आणि लवकर वाढतात. जर तुम्हाला सर्वोत्तम रिजल्ट हवे असतील तर काही खास गोष्टी लक्षात ठेवणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊयात हेअर स्पा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात व कोणत्या चुका करू नये.

नॅचरल हेअर केअरचा वापर करा

या उन्हाळ्यात तुमचे केस खूप कोरडे झाले असतील आणि तुम्ही चांगल्या सलूनमधून हेअर स्पा घेण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी नॅचरल हेअर केअरचा वापर करा. जसे की तुम्ही स्पा करण्यापूर्वी केसांना अंडी, मेंदी आणि दहीचा हेअर पॅक लावू शकता. तसेच, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या केसांवर हिटिंग टुल्सचा वापर अजिबात करू नका.

वारंवार हेअर स्पा करू नका

तुम्ही जर वांरवार हेअर स्पा करत राहीलात तर तुमचे केस हळूहळू कोरडे होऊ लागतात. म्हणून, महिन्यातून एकदा स्पा करण्याचा प्रयत्न करा. पण जर तुमचे केस खूप कुरळे, कोरडे आणि निर्जीव असतील तर तुम्ही 15 दिवसांच्या अंतराने हेअर स्पा करू शकता.

निरोगी आहार आणि जीवनशैलीची विशेष काळजी घ्या

असे म्हटले जाते की चांगले केस हे चांगल्या आहाराचे लक्षण आहे. म्हणून, तुमच्या आहारात खिचडी, डाळ-भात आणि शक्य तितके हलके पदार्थ समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा. तसेच, लसूणांचा वापर अधिक असलेले पदार्थ खाल्ल्याने केसांची स्थिती सुधारते आणि रक्ताभिसरण चांगले राहण्यास मदत होते.

पाणी पिण्याची काळजी घ्या

स्पा करताना कमीत कमी पाणी प्या. स्पा दरम्यान तुम्ही ग्रीन टी आणि लिंबू पाणी पिऊ शकता. स्पा घेतल्यानंतर लगेचच मद्यपान करू नका किंवा धूम्रपान करू नका. यामुळे तुम्हाला जास्त घाम येऊ शकतो किंवा लघवी होऊ शकते. यामुळे तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या देखील येऊ शकते.

हेअर स्पा केल्यानंतर 2 आठवडे या गोष्टी करू नका

हेअर स्पा केल्याने केस मऊ आणि चांगले होतात. पण हेअर स्पा केल्यानंतर चुकूनही केसांना ऑइलिंग किंवा हेअर पॅक लावू नका.

केस मोकळे ठेवू नका

हेअर स्पा केल्यानंतर लगेच केस मोकळे ठेवू नका. तुम्ही जेव्हा बाहेर जाता तेव्हा केस झाकून ठेवण्याचा प्रयत्न करा.

शाम्पू आणि कंडिशनरचा वापर काळजीपूर्वक करा

स्पा केल्यानंतर फक्त 2-3 आठवड्यांनी कंडिशनर वापरा. यामुळे तुमचे केस लांब, मऊ आणि चमकदार होतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.