Amitabh Bachchan : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या मौनामुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला आहे. या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले, आणि देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. अनेक सेलिब्रिटींनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया दिली, परंतु बच्चन यांनी कोणतीही स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही.
२३ एप्रिल रोजी अमिताभ बच्चन यांनी "T 5356 -" असा एक गूढ ट्वीट केला, यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या ट्वीटमध्ये कोणतीही स्पष्ट माहिती दिली नव्हती, त्यामुळे अनेकांनी त्यांच्या मौनावर प्रश्न उपस्थित केले. काहींनी विचारले, "कश्मीरमध्ये जे घडले त्यावर तुम्ही एकही पोस्ट का नाही केली?" तर काहींनी त्यांना हल्ल्याचा बदला घेतल्यावर प्रतिक्रिया देणार का असे विचारले आहे.
यांच्या या मौनामुळे सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्यांच्या मौनाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. काही चाहत्यांनी मजेशीरपणे विचारले, "जया जी काही लिहू देत नाहीत का?" तर काहींनी एलन मस्कच्या 'Grok' या AI चॅटबॉटकडे मदत मागितली की, बच्चन यांच्या मौनाचा अर्थ काय आहे.
या घटनेने च्या सामाजिक जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेकांनी असे मत व्यक्त केले की, देशातील अशा गंभीर घटनांवर सेलिब्रिटींनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडावी. बच्चन यांच्या मौनामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.