‘पीसीईटी’ येथे उद्या महिला सबलीकरण कार्यशाळा
पिंपरी, ता. ३० : पीसीईटीच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे २ मे रोजी पीसीईटीच्या ऑडिटोरियम मध्ये ‘महिला सबलीकरण व सक्षमीकरण कार्यशाळा’ होणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत (QIP) प्रायोजित ही कार्यशाळा आहे.
कार्यशाळेत सायबर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक विद्या विष्णू पाटील ‘सायबर सुरक्षा’ विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्या ऑनलाइन सुरक्षितता, सायबर गुन्हेगारी प्रतिबंध आणि डिजिटल जगतात सुरक्षित राहण्यासाठीचे उपाय याबाबत विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे या मानसिक आरोग्य राखणे, शैक्षणिक तणाव व्यवस्थापन व भावनिक सक्षमता वाढवण्याबाबत संवाद साधतील.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, शैक्षणिक प्रमुख डॉ. रुपाली कुदरे आणि विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. काजल माहेश्वरी या समन्वयक म्हणून कार्य पाहणार आहेत.