बॉलिवूड अभिनेते अनिल कपूर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनिल कपूर यांची आई निर्मल कपूर उर्फ सुचित्रा यांचं निधन झालं. वयाच्या ९० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. आठवडाभरापासून त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते.
, बोनी कपूर आणि संजय कपूर यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या निधनानं कपूर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कपूर कुटुंबीयांकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, आठवडाभरापासून मुंबईतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
निर्मल कपूर या मागील आठवडाभर रुग्णालयात दाखल होत्या. काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
अभिनेते यांनी मागील वर्षी आईच्या जन्मदिनी खास पोस्ट शेअर केली होती. सोशल मीडियावर त्यांनी बालपणीचा आईसोबतचा फोटो शेअर केला होता. तर कुटुंबीयांसोबतचा आणखी एक फोटो त्यांनी शेअर केला होता. आईसाठी त्यांनी खास ओळीही लिहिल्या होत्या.