जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी हल्ला करुन २६ पर्यटकांची हत्या केली. त्यानंतर भारताने उचललेल्या पावलांमुळे पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे. भारत कधीही हल्ला करुन शकतो, अशी भीती पाकिस्तानला आहे. सध्या भारताने युद्ध सुरु केल्याशिवाय पाकिस्तानला संकटात आणले आहे. भारताने उचललेल्या पावलांचे परिणाम पाकिस्तानला भविष्यातही भोगावे लागणार आहे. पाकिस्तानला अडचणीत आणणाऱ्या भारताच्या ९ कृतींबद्दल जाणून घेऊया.
भारताच्या हल्ल्याच्या भीतीमुळे पाकिस्तानचे राज्यकर्ते आणि राजकारणी सर्वच चिंतेत आहेत. भारत पहलगाम हल्ल्याचा बदला कधी घेईल? त्याची भीती त्यांना आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने शांततेने पावले उचली, आम्ही सर्व सहकार्य करण्यास तयार असल्याचे पाकिस्तानी राज्यकर्ते सांगत आहे. पाकिस्तानला आता भारताची रणनीती काय असेल? त्याचा अंदाज लावणे अवघड झाले आहे. पाकिस्तानच्या लष्करी थिंक टँकसाठी भारताचे धोरण सर्वात कठीण काम बनले आहे.
दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानी लष्कर आणि गुप्तचर संस्था आयएसआयच्या कल्पनेपेक्षा मोठी कारवाई भारताने केली आहे. भारताने नऊ महत्वाचे निर्णय घेतले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे.
पाकिस्तानवर केलेल्या या कारवाईमुळे पाकिस्तासमोर संकट निर्माण झाले आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या पाकिस्तानचे आर्थिक नुकसान झाले आहे. भविष्यात त्याचे गंभीर परिणाम पाकिस्तानला भोगावे लागणार आहे. डिजिटल स्ट्राइकमुळे पाकिस्तानी सेलिब्रिटीजचे उत्पन्न बंद झाले आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या गोळीबारास चोख प्रत्युत्तर भारत देत आहे. पाकिस्तान एकीकडे चर्चेच्या टेबलावर येण्याची भाषा करत असताना दुसरीकडे गेल्या सात दिवसांपासून सीमेवर गोळीबार करत आहे.
हे ही वाचा…
‘लादेनच्या मृत्यूपेक्षाही भयंकर अॅक्शन…’, पाकिस्तानसाठी अमेरिकेचे भारताला खुले आव्हान