बॉलिवूड सुपरस्टार रितेश देशमुख आणि अजय देवगणचा (Ajay Devgan ) 'रेड 2' चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासून तगडे कलेक्शन करायला सुरूवात केली आहे. 'रेड 2' (Raid 2) चित्रपट 1 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'रेड 2'मध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकला आहे. तर रितेश देशमुखने खलनायकाची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाने दोन दिवसात किती कोटींचा व्यवसाय (Box Office Collection ) केला जाणून घेऊयात.
'रेड 2'मधील देशमुखच्या (Riteish Deshmukh) अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'रेड 2' चित्रपटाने पहिल्या दिवशी 19.25 ची कमाई केली. आता चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 11.75 रुपयांचे कलेक्शन केले आहे. दोन दिवसात 'रेड 2' चित्रपटाने तब्बल 31 कोटींचा व्यवसाय केला आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत 'रेड 2'चित्रपटाची दुसऱ्या दिवशीच्या कलेक्शनमध्ये घट झालेली पाहायला मिळत आहे.
'2'चे बजेट 48 कोटी रुपये आहे. दोन दिवसांत या चित्रपटाने आपले अर्धे बजेट वसूल केले आहे. लवकरच हा चित्रपट आपले चित्रपटाचे पूर्ण बजेट वसूल करेल. 'रेड 2' चित्रपटात देवगण आणि रितेश देशमुखसोबत अजून देखील तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. यात वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला आणि सुप्रिया पाठक यांचा समावेश आहे. 'रेड 2' चित्रपट राज कुमार गुप्ता दिग्दर्शित आहे.
'रेड' 2018 ला 'रेड' प्रदर्शित झाला होता. आता सात वर्षांनी 'रेड 2' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटात कलाकारांचा दमदार अभिनय पाहायला मिळत आहे. 'रेड 2' हा ॲक्शन चित्रपट आहे. आता हा चित्रपट वीकेंडला कमाल करतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.