सोन्याची किंमत: दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळं खरेदीदारांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. सोन्याचे दर कधी कमी होणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, सध्या भारतात सोन्याच्या किमती 1 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेल्या होत्या. पण आता त्यात सुमारे 7 ते 8 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं येत्या 4 ते 6 महिन्यांत सोन्याच्या किमती त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून सुमारे 19000 रुपयांनी कमी होऊ शकतात.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील 4 ते 6 महिन्यांत सोन्याची किंमत 80000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 80 हजार ते 85 हजारांच्या दरम्यान दिसते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुल्क लादल्यानंतर सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परंतू, अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा पवित्रा थोडा बदलला आणि जागतिक तणाव स्थिर होऊ लागला, त्यामुळे सोन्याच्या किमतीही घसरल्या. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 80000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतात.
तज्ज्ञांच्या मते, सोन्याच्या किमतीत वर्षानुवर्षे वाढ दिसून येत आहे. जानेवारीमध्ये सोन्याने सुमारे 21 टक्के परतावा दिला आहे. एका वर्षात सुमारे 32 टक्के परतावा दिला आहे. यामागे अनेक कारणे आहेत, जी सोन्याला आधार देत होती. जागतिक तणाव आणि भू-राजकीय घटकांमुळे सोन्याच्या किमती वाढल्या होत्या. आता जागतिक तणाव कमी होताना दिसत आहे. अमेरिका रशिया आणि युक्रेनमध्ये कायमस्वरूपी युद्धविराम घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत सोन्याच्या किमतींना मिळणारा आधार कमी झाला आहे. यामुळे किंमत कमी होत आहे आणि ती आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
सध्या एमसीएक्सवर सोन्याची किंमत ही प्रति 10 ग्रॅम 92700 रुपये आहे. सोन्याचा भाव 62 रुपयांच्या वाढीसह 92700 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. दरम्यान पुढच्या चार ते सहा महिन्यात सोन्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासूनसोन्याचे दर सतत वाढत आहेत. याचा मोठा फटका सोन्याची खरेदी करणाऱ्यांना बसत आहे. त्यामुळं दर कधी कमी होमार असा प्रश्न विचारला जात होता?
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..