सध्या बॉक्स ऑफिसवर 'रेड 2' चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात बॉलिवूडचे दोन सुपरस्टार पाहायला मिळत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि अजय देवगणच्या (Ajay Devgan) अभिनयाचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळत आहे. 'रेड 2' (Raid 2) चित्रपट 1 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत बजेट वसूल केले आहे. चित्रपटाची तीन दिवसांची कमाई जाणून घेऊयात.
दिवस पहिला - 19.25
दिवस दुसरा - 12 कोटी
दिवस तिसरा - 18 कोटी
एकूण - 49.25 कोटी
देशमुखच्या 'रेड 2' चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 49.25 कोटींची कमाई करून चित्रपटाचे बजेट वसूल केले आहे. 'रेड 2'चे बजेट 48 कोटी रुपये आहे. 'रेड 2' चित्रपट राज कुमार गुप्ता दिग्दर्शित आहे. ''मध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकला आहे. तर रितेश देशमुखने खलनायकाची भूमिका साकारली आहे. 'रेड 2' चित्रपटात अजय देवगण आणि रितेश देशमुखसोबत अजून देखील तगडे कलाकार पाहायला मिळत आहे. यात वाणी कपूर, रजत कपूर, सौरभ शुक्ला आणि सुप्रिया पाठक यांचा समावेश आहे.
'रेड 2' हा चित्रपट 'रेड'चा सिक्वेल आहे. 'रेड' 2018 ला 'रेड' प्रदर्शित झाला होता. आता सात वर्षांनी 'रेड 2' प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'रेड 2' हा ॲक्शन चित्रपट आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'रेड 2' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे. जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलै महिन्याच्या सुरूवातीला चित्रपट ओटीटीवर येणार आहे. रविवारी 'रेड 2' किती कोटींची कमाई करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.