पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या पटनामध्ये आयोजित खेलो इंडिया यूथ गेम्सच्या समारंभाप्रसंगी व्हर्चुअली संबोधित केलं. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचा युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी यांचं कौतुक केलं. युवा क्रिकेटर वैभव सूर्यवंशी यानं संपूर्ण देशाचं लक्ष आपल्याकडे केंद्रीत केलं आहे. तो जेवढा अधिक खेळेल तेवढा तो अधिक उजळून निघेल असं मोदी यांनी म्हटलं आहे. आपण सर्वांनी बिहारचा मुलगा वैभव सूर्यवंशी याचं आयपीएलमधील प्रदर्शन पाहिलं आहे. वैभव यांने सर्वात कमी वयात एवढा मोठं रेकॉर्ड बनवला आहे. त्यांच्या यशामागे त्याने घेतलेली मेहनत आहे. तो वेगवेगळ्या स्थरावर क्रिकेट खेळला त्याची देखील त्याला मदत झाली. याचाच अर्थ असा आहे की, जो जेवढं खेळेल, तेवढं त्याला अधिक यश मिळेल, असंही यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, भारताने क्रीडा क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख बनवली आहे. भारत क्रीडा क्षेत्रामध्ये जेवढी प्रगती करेल तेवढीच देशाची सॉप्ट पावर देखील वाढेल. भारतामध्ये खेळांचं भविष्य उज्वल आहे. क्रीडा क्षेत्राला देशात चालना मिळेल असं मी वचन देतो. क्रीडा क्षेत्रासाठी ४,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे भारत क्रीडा क्षेत्रात प्रगती करेल, खेळाडूंना पायभूत सुविधा मिळतील याबद्दल मला विश्वास वाटतो, असं मोदी यांनी म्हटलं आहे.
आता खेळ फक्त एक स्पर्धा राहिली नसून तो आपल्या देशांची ओळख बनत आहे. जसा -जसा आपल्या देशात खेळ संस्कृतीचा विकास होईल तशी-तशी देशाची ताकद एका सुपरपावरमध्ये बदलेल. दरम्यान या कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा बिहारमधील खाद्य पदार्थांचं देखील कौतुक केलं आहे. तुम्ही जेव्हा बिहारला जाल तेव्हा तेथील लिट्टी -चोखा जरूर खा, तसेच बिहारचा मखाना देखील खायला विसरू नका असं मोदी यांनी म्हटलं आहे.