केदाखेडा : परिसरात सलग तीन तेचार दिवसापासुन तापमान 43अंश सेल्सियस पर्यंत गेल्यामुळे शरीराची लाही लाही होत असुन त्यातच दुकानाजवळ आलेल्या माकड पाण्यावाचुन त्रस्त झाले बघुन स्वत:साठी घरीहुन आलेल्या जेवनातील डबा काही माकडास देत बादलीत पाणी देऊन माकड पाणी पिऊन तृप्त झाले.
परिसरात दिवसानंदिवस वाढत असलेले तापमान पाहता, परिसरातील पाझर तलाव,विहिरी,नदी,औढे कोरडे झाल्यामुळे वन्यप्राणीसाठी पिण्यासाठी पाणीच उपलब्ध नसल्याने मणुष्य वस्तीत येऊन एक प्रकारे पाण्यासाठी याचना करत असल्याचे दिसत असल्यानेव विकत घेत असलेले पाणी मुक्याप्राण्याची तहान भागवणे हे माणसाचे प्रमकर्तव्य समजत पोपळघट यांनी या मुक्या प्राण्याची तहान भागवल्याने दररोज दोन दिवसापासुन हे मुके प्राणी दररोज दुकान समोर येत असल्याने हे उन्हाळा संपेपर्यंत हे यामुक्यांना पाणी देऊन तहान भागवणार असल्याचे पोपळघट यांनी सांगितले.
दुकानसमोर आलेल्या मुक्या प्राण्याला तहान लागल्याचे लक्षात आले.पहिल्यादिवशी दुरवरून पाणी ठेवले.तसेच दुस-यादिवशी ते माणसाळले व जवळ बादली ठेवली त्यांची भीती नाहीशी झाली .पुर्ण उन्हाळाभर हा उपक्रम करणार आहे.