ज्येष्ठ स्वंयसेवक वसंत साने यांचे निधन
esakal May 05, 2025 01:45 AM

पडघा (बातमीदार)ः येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक वसंत साने यांचे यांचे शुक्रवारी (८९) व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. शांत, मनमिळाऊ स्वभावाचे असलेले अजातशत्रू म्हणून त्यांची ओळख होती. लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले साने यांनी मुख्य शिक्षक ते कार्यवाह अशी पदे भूषविली होती. आणीबाणीच्या काळात कारावासही भोगला होता. विवेकानंद वाचनालयाचे सर्वात जुने सभासद तसेच जनसंघ ते भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असा जीवनप्रवास होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली असा परिवार आहे. पडघा ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच शरद साने, अॅड. शिरीष साने यांचे ज्येष्ठ बंधू होते. त्यांच्या अंत्ययात्रेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.