वज्रेश्वरी (बातमीदार): महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रांगणात समितीचे सचिव यशवंत म्हात्रे यांच्याहस्ते ध्वजवंदन करण्यात आला. या प्रसंगी बाजार समितीचे संचालक मोहन म्हणेरा, सागर देसक, मीराबाई गायखे, स्वीकृत सदस्य मिठाराम पाटील समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच शेतकरी आणि व्यापारी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन करताना समितीचे संचालक प्राध्यापक श्रीराम पाटील यांनी महाराष्ट्र गीत गायन केले. यावेळी बाजार समितीचे संचालक श्यामदास भगत यांनी उत्तम प्रकारे साथ दिली. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात बलिदान केलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.