जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर भितीच्या सावटाखाली दिवस काढण्याची वेळ आली आहे. भारत कुठल्याही क्षणी हल्ला करेल, ही पाकिस्तानला भिती सतावत आहे. म्हणून भेदरलेल्या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात धाव घेतली आहे. भारताबरोबर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपातकालीन सत्राची मागणी केली होती. आज 5 मे रोजी ही बैठक होईल. बंद खोलीत ही बैठक होईल. UNSC च अध्यक्षपद भूषवणाऱ्या ग्रीसने या बैठकीच आयोजन केलं आहे. क्षेत्रीय शांतता आणि सुरक्षेवर या बैठकीत चर्चा होईल. या बैठकीआधी ग्रीसच्या स्थायी प्रतिनिधीने पाकिस्तानच्या तुलनेत भारत कैकपटीने मोठा देश असल्याच मान्य केलं.
आज सोमवारी होणाऱ्या बैठकीत दोन्ही बाजूंना आंतरराष्ट्रीय समुदायासमोर सीमेवरील तणावासंदर्भात आपले विचार मांडण्याची संधी मिळेल. संयुक्त राष्ट्रातील ग्रीसचे स्थायी प्रतिनिधी आणि मे महिन्यातील सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष, राजदूत इवेंजेलोस सेकेरिस यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं की, “ही सैद्धांतिक स्थिति आहे. आम्ही दहशतवादाच्या सर्व रुपांची निंदा करतो. त्याशिवाय हा जो तणाव वाढतोय, त्याची आम्हाला चिंता आहे” ‘पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आम्ही निषेध केला, ज्यात निरपराध नागरिका मारले गेले’ असं इवेंजेलोस सेकेरिस म्हणाले.
चांगले संकेत काय?
UNSC मध्ये सहभागी असणारे बहुतांश देश भारतासोबत आहेत. दहशतवादाविरुद्ध कारवाईची मागणी करत आहेत. चीनशिवाय सर्व देश भारतासोबत आहेत. त्यामुळे पाकिस्तान बिथरला आहे. बैठकीआधी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सर्व देशांच्या सदस्यांसोबत चर्चा केली आहे. पाकिस्तानी बैठकीत काहीही बोलूं दे, पण त्याआधीच वास्तव परिस्थिती सगळ्यांसमोर आहे.
कोण-कोण आहे UNSC चे सदस्य
वीटो-अधिकारवाले 5 स्थायी सदस्य – चीन, फ्रान्स, रशिय, ब्रिटेन आणि अमेरिका. त्याशिवाय परिषदेचे 10 गैर-स्थायी सदस्य अल्जीरिया, डेन्मार्क, ग्रीस, गुयाना, पाकिस्तान, पनामा, दक्षिण कोरिया, सिएरा लियोन, स्लोवेनिया आणि सोमालिया हे देश आहेत.
भारताची तात्काळ Action
भारताने पाकिस्तान विरोधात अनेक निर्णय घेतले आहेत. यात सिंधू जल कराराला स्थगिती. अटारी लँड-ट्रांजिट पोस्ट तात्काळ बंद करणं हे निर्णय आहेत. पाकिस्तानने सर्व भारतीय एअरलाइन्ससाठी आपलं हवाई क्षेत्र बंद केलं आहे. नवी दिल्लीसोबत व्यापार निलंबित केला आहे. भारताने सतत पाकिस्तान विरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे.