पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरात निषेध केला जात आहे. बहुतेक देशांनी दहशतवादाविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात भारताला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले असले तरी, परदेशात राहणारा भारतीय समुदाय देखील या घृणास्पद गुन्ह्याचा निषेध करत आहे. जर्मनीतील भारतीय समुदायाचे लोकही सतर्क आहेत. येथील प्रसिद्ध शहरांपैकी एक असलेल्या म्युनिकमध्ये, मोठ्या संख्येने भारतीय लोकांनी तिरंगा घेऊन शहरात मोर्चा काढला. त्यांनी जगभरात शांतता आणि न्यायाचे आवाहन केले.
दहशतवादी हल्ल्याबदद्ल एकता आणि सामूहिक दुःख व्यक्त करण्यासाठी म्युनिकमधील भारतीय समुदायाने 3 मे (शनिवार) रोजी भारत शांती मार्च (Bharat Peace March) काढला. या मोर्चात 700 हून अधिक भारतीय प्रवासी सहभागी झाले होते. त्यांनी दहशतवादाचा तीव्र निषेध केला. तसेच पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या अमानुष आणि भ्याड दहशतवादी हल्ल्यातील बळींना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
अतिशय शांततापूर्ण असा हा मोर्चा केवळ प्रतीकात्मक नव्हता तर न्यायाची मागणी करण्यासाठी, दहशतवादी हल्ल्यांचा निषेध करण्यासाठी आणि शांतता आणि मानवतेवर आधारित भविष्य घडवण्यावर त्याचा भर होता. शनिवारी सकाळी 11 वाजता गेश्विस्टर-शॉल-प्लॅट्झ (Geschwister-Scholl-Platz) येथे मोर्चासाठी लोक जमले.
कार्यक्रमाची सुरुवात अनेक प्रमुख व्यक्तींच्या भाषणांनी झाली, ज्यात प्रसिद्ध जर्मन हृदयरोगतज्ज्ञ आणि बुंडेस्टॅगचे सदस्य डॉ. हान्स थेइस (२०२५ चे बुंडेस्टॅग सदस्य) आणि एलएच म्युनिकच्या सिटी कौन्सिलर आणि अप्पर बव्हेरिया जिल्हा परिषदेच्या सदस्य डेली बालिदेमाज यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात अनेक प्रमुख व्यक्तींच्या भाषणांनी झाली, ज्यात प्रसिद्ध जर्मन हृदयरोगतज्ज्ञ आणि बुंडेस्टॅगचे सदस्य डॉ. हान्स थीस (2025 चे बुंडेस्टॅग सदस्य) आणि एलएच म्युनिकच्या सिटी कौन्सिलर आणि अप्पर बव्हेरिया जिल्हा परिषदेच्या सदस्य डेली बालिदेमाज यांचाही समावेश होता.
आपल्या भाषणात, डॉ. थीस यांनी पहलगाम हल्ल्यातील बळींसाठी प्रार्थना केली आणि सर्व प्रकारच्या दहशतवाद आणि धार्मिक अतिरेकीपणाचा निषेध केला. तसेच, भारतीय स्थलांतरितांच्या पुढाकाराचे कौतुक करताना ते म्हणाले, “ही शांतता यात्रा जगाला एक अतिशय महत्त्वाचा संदेश आहे की आपण एकत्र उभे आहोत, द्वेषाचा विचार नाकारतो. आपण शांतता स्वीकारतो. अशा प्रकारची दहशतवादी कृत्ये पुन्हा कधीही घडू नयेत याची आपण खात्री केली पाहिजे. दोषींना शिक्षा झालीच पाहिजे.” असे ते म्हणाले.
“त्याच वेळी, भारत आणि पाकिस्तान (दोन अण्वस्त्रधारी देश) यांच्यातील पुढील तणाव टाळण्यासाठी आपण शक्य ते सर्व प्रयत्न केले पाहिजेत. आज, आम्ही पीडितांसोबत उभे आहोत. ते एकटे नाही आहात” असा संदेश त्यांनी दिला. डेली बालिदेमाझ यांनीही त्यांच्या भाषणात एकता आणि शांतीच्या संदेशाचा पुनरुच्चार केला.
म्युनिकमध्ये हा, इंडिया पीस मार्च दुपारी 12 वाजून 20 मिनिटांनी वाजता गेश्विस्टर-शॉल-प्लॅट्झ येथून सुरू झाला आणि म्युनिकच्या मध्यभागातून जात दुपारी 2 वाजता म्युनिक फ्रीहाइट येथे संपला. येथे आल्यानंतर भारतीय समुदायाच्या लोकांनी शांतता, एकता आणि न्यायाचे नारे दिले. तसेच, हल्ल्यतील बळीच्या आणि त्यांच्या कुटुबियांच्या सन्मानार्थ एक मिनिट मौन पाळण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी, ‘जन गण मन’ हे भारताचे राष्ट्रगीत सामूहिकपणे गायले गेले.
या मार्चमध्ये सर्व स्तरातील (विद्यार्थी, व्यावसायिक, कुटुंबे आणि समुदाय नेते) लोकं सहभागी झाले होते. म्युनिकमधील कार्यक्रमाच्या मुख्य आयोजकांपैकी एक शोभित सरीन म्हणाले, “ही केवळ शांतता यात्रा नव्हती. ती न्यायासाठी सामूहिक आवाहन देखील होती.” पहलगाममध्ये ज्यांचा आवाज दाबण्यात आला होता त्यांच्यासाठी आणि शांतता, न्याय आणि मानवी जीवनाच्या प्रतिष्ठेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भारतीयासाठी आम्ही मोर्चा काढला.” असे त्यांनी नमूद केलं.