Maharashtra Board 12th Result 2025 Declared: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. मागील वर्षापेक्षा यंदा कमी निकाल लागला आहे. तसेच यंदाच्या निकालात शंभर टक्के कोणालाही मिळवता आले नाही. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर होण्याची मंडळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे. यंदा मंडळाने बारावीच्या परीक्षाही लवकर घेतल्या होत्या.
बारावीत शंभर पैकी शंभर गुण मिळवणारा एकही विद्यार्थी नाही. परंतु शंभर टक्के निकाल लागलेली अनेक महाविद्यालये आहेत. राज्यातील 1 हजार 929 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तसेच 90 ते 99.99 टक्के निकाल लागलेली महाविद्यालये 4 हजार 565 आहेत.
राज्यात 10 हजार 496 कॉलेजातून विद्यार्थी बसले होते. त्यात शून्य टक्के निकाल लागलेली महाविद्यालये 38 आहेत. यंदा निकाल मागील वर्षाच्या तुलनेत कमी लागला आहे. फेब्रुवारी मार्च 2024 चा निकाल 93.37% होता. फेब्रुवारी मार्च 2025 चा निकाल 91.88 टक्के लागला आहे. निकालाचा टक्का 1.49 ने कमी झाला आहे. यंदा २० हजार ९४३ विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किंवा स्काऊट गाईडचे गुणे मिळाले आहेत. यंदा तृतीयपंथी १८ विद्यार्थी बसले होते.
राज्यातील नऊ विभागीय मंडळातून एकूण 14 लाख 27 हजार 85 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यापैकी 13 लाख 2873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर पॅटर्न म्हणजे काही विद्यार्थी चांगले मार्क मिळवतात. त्याचा अर्थ असा नाही की सर्वच विद्यार्थी चांगले मार्क मिळवतात. त्यांची गुणवत्ता चांगली असू शकते. पण त्यांचा निकाल सर्वात शेवटचा आहे, असे मंडळाकडून पत्रकार परिषदेत सांगितले.
दुपारी 1 वाजल्यापासून बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना ‘टीव्ही 9 मराठी’च्या वेबसाईटवर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना विषयनिहाय मिळालेल्या गुणांचा तपशील ऑनलाईन पाहता येणार आहे. तसेच उद्यापासून (6 मे) महाविद्यालयांमध्ये गुणपत्रिका मिळतील.
2) https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams