विद्यार्थ्यांच्या करीअरमध्ये बारावीची परीक्षा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनात 10 वी आणि 12 वी च्या परीक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून पालकांकडून या दोन बोर्डाच्या परीक्षांना खूप महत्त्व दिलं जातं. कारण बारीवीत मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांच्या पुढच्या करीअरचा पाया उभा राहतो. विद्यार्थ्यांना पुढे कुठल्या शाखेला जायचं आहे ते ठरवलं जातं. आज बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. एकूण नऊ विभागीय परीक्षा मंडळातून पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, कोकण, छत्रपती संभाजी नगर, लातूर या विभागातून एकूण 14 लाख 27 हजार 85 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
यात विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय, आयआयटी या शाखांचे विद्यार्थी होते. यातून 14 लाख 17 हजार 969 विद्यार्थी प्रविष्ट झाले. आज जाहीर झालेल्या निकालानुसार, 13 लाख 2 हजार 873 विद्यार्थी पास झाले. यंदा 91.88 टक्के निकाल लागला.
कोकणाचा निकाल किती टक्के?
नेहमीप्रमाणे यंदाही 9 विभागांच्या निकालात कोकण विभागीय मंडळाने बाजी मारली आहे. कोकणची मुलं हुशार निघाली आहेत. यंदाच्या वर्षीही कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. मागच्या काही वर्षांपासून असलेली परंपरा यंदाही कायम राखली आहे. कोकण विभागातून सर्वाधिक 96.74 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाली आहेत. त्यात लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी 89.46 टक्के निकाल लागला आहे.
कुठल्या शाखेतून किती विद्यार्थी उत्तीर्ण
विज्ञान शाखा
नोंदणी – ७ लाख ३७ हजार २०५ परीक्षेला बसले – ७ लाख ३५ हजार ३ उत्तीर्ण – ७ लाख १५ हजार ५९५ पास झाले. टक्केवारी – ९७.३५ टक्के
कला शाखा
नोंदणी – ३ लाख ५४ हजार ६९९. परीक्षेला बसले ३ लाख परीक्षेला बसले – ४९ हजार ६९६ उत्तीर्ण – २ लाख ८१ हजारह ६०६ टक्केवारी – ८०.५२ टक्के
वाणिज्य विभाग
नोंदणी – ३ लाख ७६६ परीक्षेला बसले – २ लाख ९९ हजार ५२७ उत्तीर्ण – २ लाख ७७ हजार ६२९ टक्केवारी – ९२.६८
व्यवसाय
नोंदणी – ३० हजार १७ परीक्षेला बसले – २९ हजार ३६३ उत्तीर्ण – २४ हजार ४५० टक्केवारी – ९३.२६
आयटीआय
नोंदणी – ४ हजार ३९८ परीक्षेला बसले – ४३८० उत्तीर्ण – ३५९३ टक्केवारी – ८२.०३
नियमित विद्यार्थ्यांचा निकाल ९१.८८ टक्के