सर्वोच्च न्यायालयात वक्फ सुधारणा कायद्याच्या खटल्याबद्दल काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील सलमान खुर्शीद म्हणाले, "...आम्ही या खटल्यासाठी पूर्णपणे तयार आहोत."
Waqf Amendment Act Live Updates: वक्फ (सुधारणा) कायद्याची सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी सुरूवक्फ (सुधारणा) कायदा २०२५ ला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी सुरू केली.
Live : अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होणारराज्यभर अकरावीचा प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 2025 - 2026 पासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यापूर्वी अकरावीची केंद्रीय ऑनलाईन प्रवेश राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, अमरावती, नागपूर आणि नाशिक, या महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयात राबविण्यात येत होती. आता ही राज्यभरातील उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने राबवण्यात येईल.
Live : पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळेंच्या कुटुंबियांशी सुप्रिया सुळेंनी घेतली भेटखासदार सुप्रिया सुळे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सुप्रिया सुळे यांनी संतोष जगदाळे यांच्या पत्नी आणि मुलगी आसावरी जगदाळे यांच्याशी संवाद साधला.
Live : बारावी निकालाचा फर्ग्युसन जूनियर कॉलेजमध्ये ढोल ताशांच्या गजरात जल्लोषइयत्ता बारावी परीक्षेच्या निकालाचा जल्लोष
फर्ग्युसन जूनियर कॉलेजमध्ये ढोल ताशांच्या गजरात जल्लोष
Live : संतोष देशमुखांची मुलगी वैभवीला बारावीत 85.33 टक्केसंतोष देशमुखांची मुलगी वैभवीला बारावीत 85.33 टक्के
वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार, अश्रु अनावर
Live Update: राजनाथ सिंह आणि जनरल नकातानी यांच्यात द्विपक्षीय बैठकसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि जपानचे संरक्षणमंत्री जनरल नकातानी यांच्यात द्विपक्षीय बैठक.
वॉशिंग्टनमध्ये 8 मेपर्यंत होणाऱ्या जागतिक बँक भूमी संमेलनात भारत भूमी सुधारणा चर्चासत्राचं नेतृत्व करणार! स्वामित्व योजनेचं सादरीकरण करत, तंत्रज्ञानाच्या मदतीनं जमिनीच्या हक्कांचे सशक्तीकरण हा संदेश भारत देणार.
Live Update : आरोग्य विभागात उपकरण खरेदी प्रकरणात भ्रष्टाचारआरोग्य विभागात उपकरण खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याची माहिती समोर आली आहे.
Live : डोनाल्ड ट्रम्प म्हणत नाही तोपर्यंत पाकिस्तानवर कारवाई होणार नाही का? प्रकाश आंबेडकरांचा सवालपहलगाम हल्ल्यानंतर भारतीय जनता पाकिस्तान विरोधात कारवाई मागते
एक आठवडा होऊन गेला तरी सुद्धा सरकारकडून काही इंडिकेशन मिळत नाही
Pakistan चे Don पेपर मध्ये एक बातमी आहे. जेसन मिलर नावाची व्यक्ती जी डोनाल्ड ट्रम्प यांचे मित्र आहेत असं सांगितलं जातं, ते ट्रम्प यांचे आधी सल्लागार होते, त्यांची नेमणूक झाली आहे
या सल्लागाराकडून परवानगी मिळवली जाणार का?
डोनाल्ड ट्रम्प म्हणत नाही तोपर्यंत पाकिस्तानवर कारवाई होणार नाही का?
काल सगळ्या युट्यूब चॅनेल पाकिस्तान मधून बंद केल्या आहेत
भाजपला आम्ही विचारत आहोत, जेसन मिलर यांची तुम्ही नेमणूक केली आहे का? तिकडून परवानगी आल्याशिवाय कारवाई करणार नाहीत का?
मिलर यांना आत्ताच नेमलेले आहे. लॉबिंग करण्यासाठी त्यांना नेमलेले आहे असं सांगितलं जातं
पाकिस्तान विरोध लॉबिंग करण्यासाठी मिलर यांना १.५० लाख डॉलर मिळणार आहेत
एका बाजूला युनायटेड नेशन ने कारवाई करू नये अशी भुमिका आहे आता यात लॉबिंग होतं आहे
डॉन ने ही बातमी ४ दिवसांपूर्वी दिली होती जेव्हा भारताने युट्यूब चॅनेल वर तोपर्यंत बंदी आणली नव्हती
नऊ विभागीय मंडळात कॉपी प्रकरण१२४ केंद्र चौकशी करून कारवाई होणार पुणे ४५ नागपूर ३३ छत्रपती संभाजी नगर 214 मुंबई 9 कोल्हापूर 7 अमरावती 17 नाशिक 12 लातूर 37 एकूण ३७४ कॉपी प्रकार उघडकीस....
Live : पंढरपूरमध्ये उजनीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलनउजनीच्या डाव्या कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडावे या मागणीसाठी पंढरपूर तालुक्यातील आढीव व परिसरातील शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे
सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली आहे शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
या भागातील शेतकऱ्यांनी रीतसर पाटबंधारे विभागाकडे पाणी मागणी अर्ज केले आहेत. तरीही अद्याप या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळाले नाही.
पाटबंधारे विभागाने तातडीने शेतीसाठी व पिण्यासाठी कालव्यातून पाणी सोडावे अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा या भागातील शेतकऱ्यांनी दिला आहे.
HSC Result 2025 : बारावीचा निकाल ९१.८८ टक्के, कोकण अव्वल तर लातूर सर्वात कमीपुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या ९ विभागीय मंडळात बोर्डाची परीक्षा घेण्यात आली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा राज्याचा निकाल ९१.८८ टक्के इतका लागला आहे. कोकण विभाग पुन्हा एकदा अव्वल आलंय. ९६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. तर लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागलाय.
HSC Result Live : गैरप्रकार झालेली १२४ केंद्र बंद करणार, शरद गोसावी यांची माहिती124 केंद्रावर गैरप्रकार आढळले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. संबंधित केंद्र कायमस्वरुपी बंद केली जाणार असल्याची माहिती बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
HSC Result 2025 : बारावीचा निकाल जाहीर, बोर्डाने घेतली पत्रकार परिषदराज्यात ११ फेब्रुवारी ते मंगळवार,१८ मार्च २०२५ या कालावधीत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती.
८,१०,३४८ मुले
६,९४,६५२ मुली
३७ ट्रान्सजेंडर
एकूण १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती तर या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. अकरा वाजता बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी निकाल जाहीर करणार आहेत. तर विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीनं निकाल जाहीर होईल.
मुंबईत ६ मजली इमारतीला आग, कपड्यांचे शोरूम आगीच्या भक्ष्यस्थानीदक्षिण मुंबईतील ग्रँटरोड इथल्या पेडर रोड परिसरात ६ मजली इमारतीला आग लागली. या इमारतीत असलेल्या लिबास या कपड्यांच्या दुकानात आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
Maharashtra Weather Update : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, विदर्भाला गारपीटीनं झोडपलंमहाराष्ट्रात विदर्भासह अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय. नागपुरला रविवारी गारपीटीनं झोडपलं. आता राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Sanjay raut Live : भाजप लवकरच शिंदेची शिवसेना फोडणार- संजय राऊतसंजय राऊत यांनी पुन्हा भाजपवर टीका केली आहे. भाजप लवकरच शिंदेंची शिवसेना फोडणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Mumbai Live : अभिनेता एजाज खानवर अत्याचाराचा गुन्हा दाखलअभिनेता एजाज खान याच्यावर बलात्काराचारा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवोदित अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन मुंबईतील चारकोप पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai Live : मुंबईतील पेडर रोडवरील कपड्यांच्या शोरुमला भीषण आगपेडर रोडवरील कपड्यांच्या शोरूममध्ये लागलेल्या आगीच्या घटनेबाबत विभागीय अग्निशमन अधिकारी ईबी मॅटले यांनी सांगितले की "आज सकाळी ६.३० ते ७ वाजण्याच्या सुमारास येथे आग लागली. दुकानात खूप धूर होता. दुकानाच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या आणि खाली येऊ न शकणाऱ्या लोकांना टेरेसवर नेण्यात आले. पाळीव प्राण्यांनाही सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. एकूण २४ जण, दोन कुत्रे आणि एका मांजरीलाही वाचवण्यात आले आहे. आता परिस्थिती सामान्य आहे."
Mumbai Showroom Fire : मुंबईतील पेडर रोडवरील कपड्यांच्या शोरूमला आग; अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखलमुंबईतील पेडर रोडवरील कपड्यांच्या शोरूमला आग लागली असून अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (ता. ५) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या हस्ते जयसिंगपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा व म्युझियमचे लोकार्पण होणार आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर वाहनाने ते जयसिंगपूरला जातील. त्यांच्या हस्ते शिवरायांचा अश्वारुढ पुतळा व म्युझियमचे लोकार्पण होणार आहे. तेथून रात्री आठ वाजता ते कोल्हापूर विमानतळावर येतील. तिथून मुंबईकडे रवाना होतील.
Mumbai-Goa Highway Accident : मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, 30 हून अधिक जखमीरायगड : मुंबईहून कोकणात निघालेल्या खासगी बसला मुंबई-गोवा हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघातात दोन प्रवाशांना प्राण गमवावे लागले, तर 30 हून अधिक प्रवासी जखमी आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या पनवेल तालुक्यातील कर्नाळा खिंड येथे रविवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
Supreme Court : शिवसेना पक्ष व चिन्हाबाबत बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणीनवी दिल्ली : शिवसेना पक्ष नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या मुद्द्यावर येत्या बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटांनी पक्ष नाव आणि चिन्हावर दावा केला आहे. न्या. सूर्यकांत आणि न्या. एन. कोटेश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर सात तारखेच्या कामकाजात या खटल्याचा समावेश करण्यात आला आहे. याच खंडपीठासमोर राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष नाव आणि घड्याळ चिन्हाच्या संदर्भात १४ मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. मागील दीड वर्षांपेक्षा जास्त काळ दोन्ही खटल्यांवर सुनावणी झालेली नाही. त्यामुळे उभय खटल्यांची होत निकाल लागणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Boot Factory Fire : कानपूरमधील बूट कारखान्यात भीषण आग; दोघांचा होरपळून मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीरकानपूरमधील रहिवासी भागात चालणाऱ्या बेकायदेशीर बूट कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत दोघांचा मृत्यू झाला. आग शॉर्ट सर्किटमुळे लागली आणि पाच मजली इमारतीत पसरली. तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दल आणि एसडीआरएफच्या पथकांनी रात्रभर काम केले.
मागील काही दिवसांपासून भारताविरोधात गरळ ओकत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी मंत्री बिलावल भुट्टो यांची ‘एक्स’ खाती भारतात बंद करण्यात आली आहेत. भारताविरोधात प्रक्षोभक माहिती पसरवत असलेली १६ युट्यूब चॅनेल अलीकडील काळात बंद करण्यात आली होती, तर हनीया अमीर, माहिरा खान, अली जाफर अन्य काही कलाकारांची सोशल मीडिया खात्यांना प्रतिबंध घालण्यात आला होता.
Gokul Milk Rate Hike : 'गोकुळ'चे दूध दोन रुपयांनी महागले, आजपासून नवे दर लागूकोल्हापूर : गाय व म्हैस दूध खरेदी दरात वाढ केल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय व म्हैशीच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (ता. ५) नवे दर लागू होणार आहे.
Weather Update : राज्यात आज वादळी पावसाचा इशारा; पूर्व विदर्भात ऑरेंज अलर्ट जारीपुणे : कमाल तापमानातील वाढ, असह्य चटका आणि उकाडा तापदायक ठरत असतानाच, राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण होत आहे. आज (ता. ५) राज्यात पावसाची शक्यता असून, पूर्व विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा (ऑरेंज अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. उर्वरित विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सावधानतेचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
12th Exam Result : बारावी परीक्षेचा निकाल आज होणार जाहीरपुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी (ता. ५) दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. राज्य मंडळ यंदा मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बारावीचा निकाल जाहीर करणार असून, हा एक नवा विक्रमच आहे. तसेच, यंदा पहिल्यांदा डिजीलॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध केली आहे.
India Government : भारत सरकारने चिनाब नदीवरील बागलीहार धरणाचे पाकिस्तानात वाहणारे पाणी केले बंदLatest Marathi Live Updates 5 May 2025 : माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे. तसेच पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू पाणीवाटप करार स्थगित करणाऱ्या भारत सरकारने पाकिस्तानला आणखी एक दणका देताना जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवरील बागलीहार धरणाचे पाकिस्तानात वाहणारे पाणीही बंद केले आहे. याशिवाय, मागील काही दिवसांपासून भारताविरोधात गरळ ओकत असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि माजी मंत्री बिलावल भुट्टो यांची ‘एक्स’ खाती भारतात बंद करण्यात आली आहेत. कमाल तापमानातील वाढ, असह्य चटका आणि उकाडा तापदायक ठरत असतानाच, राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण होत आहे. आज राज्यात पावसाची शक्यता असून, पूर्व विदर्भात जोरदार वादळी पावसाची शक्यता असल्याने दक्षतेचा (ऑरेंज अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. गाय व म्हैस दूध खरेदी दरात वाढ केल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) गाय व म्हैशीच्या दूध दरात प्रतिलिटर दोन रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..