शिक्षकांच्या थकीत वेतनासाठी शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शाळेतील मुख्याध्यापकांना पैशाची मागणी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंगोलीच्या वसमत विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चंद्रकांत नवघरे शिक्षण अधिकाऱ्यांच्या या प्रकारावर चांगलेच भडकले आहेत. असे धंदे करू नका, शिक्षकांकडून पैसे खाऊ नका, अशी तंबी आमदार नवघरे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिली आहे.
Mahayuti Government : नागपूर, नाशिक, धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसाठी महायुती सरकार 750 कोटींचे अर्थसाह्य देणारनागपूर, नाशिक, धाराशिव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा परवाना वाचवण्यासाठी शेवटीची संधी म्हणून, या बँकांना सुमारे 750 कोटींचे अर्थसाह्याचा हातभार देण्याच्या हालचाली महायुती सरकार दरबारी सुरू आहे. संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे या तिन्ही जिल्ह्यातील मध्यवर्ती बँका अडचणीत आहेत.
Pahalgam Attack : भारतीय जहाजांना पाकिस्तानात बंदीपहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानावर जहाजबंदी केल्यानंतर पाकिस्ताननेही भारतीय ध्वजधारी जहाजांना त्यांच्या बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली. पाकिस्तानातून येणाऱ्या वस्तूंच्या आयातीवर आणि पाकिस्तानी जहजांच्या बंदरांमध्ये प्रवेशावर भारताने बंदी घातली आहे.
Pahalgam Terror Attack : हवाई दलप्रमुख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटहवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच भेट घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे सुरक्षा परिस्थितीवर दोघांनी भेट महत्त्वाचे ठरते. या दोघांमध्ये सुरक्षाच्या दृष्टीने गंभीर मुद्यांवर चर्चा झाली.
Jammu and Kashmir Army jawan accident : लष्कराचा ट्रक 700 फूट दरीत कोसळला; तीन जवानांचा मृत्यूजम्मू-काश्मीरमधील रामबन जिल्ह्यात लष्कराचे वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात तीन जवानांचा मृत्यू झाला. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर ही अपघात झाला. बॅटरी चष्माजवळ जात असताना लष्कराचा ट्रक 700 फूट दरीत कोसळला.
Accident News : कर्नाळा घाटात खासगी बसचा भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू, तर 19 जण जखमीकर्नाळा अभयारण्यमधील घाटात रविवारी रात्री खासगी बसला झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर 19 जण जखमी आहेत. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. पनवेलवरून रायगडच्या दिशेला जाणाऱ्या मार्गिकेवर हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले.