SRH vs DC Toss : हैदराबादने टॉस जिंकला, दिल्ली विरुद्ध फिल्डिंगचा निर्णय, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
GH News May 05, 2025 10:08 PM

आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 55 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने आहेत. या सामन्याचं आयोजन हे हैदराबादमधील राजीव गांधी स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. पॅट कमिन्स याच्याकडे हैदराबादचं तर अक्षर पटेलकडे दिल्लीच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजता टॉस झाला. हैदराबादच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. पॅट कमिन्स याने फिल्डिंगचा निर्णय घेत दिल्लीला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. दिल्लीने हैदराबाद विरूद्ध अखेर अनेक सामन्यांच्या प्रतिक्षेनंतर घातक गोलंदाजांना संधी दिली आहे.

टी नटराजन याचा समावेश

दिल्ली कॅपिट्ल्सने हैदराबाद विरूद्धच्या सामन्यासाठी तब्बल 10 सामन्यानंतर टी नटराजन याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी दिली आहे. टी नटराजन याला मुकेश कुमार याच्या जागी संधी देण्यात आली आहे.  नटराजन याने 2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. नटराजन याला या 18 व्या मोसमात प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळण्यासाठी 10 सामन्यांची प्रतिक्षा करावी लागली. त्यामुळे आता नटराजनसमोर ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि हेन्रिक क्लासेन या स्फोटक फलंदाजांना झटपट आऊट करण्याचं आव्हान असणार आहे.

दोन्ही संघांचा 11 वा सामना

दरम्यान हैदराबाद आणि दिल्ली या दोन्ही संघांचा हा या मोसमातील 11 वा सामना आहे. दिल्लीने 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत. मात्र दिल्लीचा गेल्या 3 सामन्यांमध्ये सलग पराभव झाला आहे.त्यामुळे दिल्लीसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना फार महत्त्वाचा आहे. तर हैदराबादने 10 फक्त 3 सामनेच जिंकले आहेत. मात्र त्यानंतरही हैदराबाद अधिकृतरित्या बाहेर झालेली नाही. त्यामुळे हैदराबादला काही अंशी प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी आहे. त्यामुळे या सामन्यात दोन्ही संघात चुरस पाहायला मिळणार आहे.

हैदराबादने टॉस जिंकला

सनरायझर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, इशान किशन (विकेटकीपर), सचिन बेबी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी आणि एशान मलिंगा.

दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन: फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (डब्ल्यू), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव आणि टी नटराजन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.