बहुप्रतिक्षेत असलेला राज्य मंडळाचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेतलेली बारावीची परीक्षा १४ लाख १७ हजार ९६९ विद्यार्थ्यांनी दिली.
१३ लाख दोन ८७३ हजार ४६८ म्हणजेच तब्बल ९१.८८ टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.
गेल्यावर्षीच्या (२०२४) तुलनेत यंदा निकालात १.४९ टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले आहे.
राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांच्या १४ लाख २७ हजार ८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली.
राज्यात कोकण विभागाचा निकाल ९६.७४ टक्के असा सर्वाधिक लागला आहे.
लातूर विभागाचा ८९.४६ टक्के असा सर्वात कमी निकाल आहे.
मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.५८ टक्के असून मुलांचा निकाल ८९.५१ टक्के आहे. तर
उत्तीर्ण मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा तब्बल ५.०७ टक्क्यांनी जास्त आहे.