Amaravati News: २२ वर्षीय कुस्तीपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, अमरावतीत हळहळ
Saam TV May 06, 2025 03:45 AM

अमरावतीतून एक अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका राज्यस्तरीय कुस्तीपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कुस्तीपटूला अचानक उलट्या आणि पाय दुखण्याचा त्रास जाणवू लागला. तिची प्रकृती अधिक बिघडत चालली. नातेवाईकांनी तातडीने तिला रूग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कुस्तीपटूच्या अकाली निधनानंतर क्रीडा प्रेमींनी आणि नागरिकांनी शोक व्यक्त केला आहे.

(वय वर्ष २२) असे मृत तरूणीचे नाव आहे. ती अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरातील रहिवासी होती. मिळालेल्या माहितीनुसार, प्राप्तीला अचानक उलट्या आणि पाय दुखण्याचा त्रास जाणवू लागला. तिने आपल्या भावाला फोन करून “मी घरी येत आहे” असे सांगितले. भावाने तिला सकाळी अमरावतीहून घरी आणले. घरी विश्रांती घेत असतानाच अचानक तिची प्रकृती अधिकच बिघडली.

प्रकृती बिघडल्यानंतर नातेवाईकांनी तिला तातडीने दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. मृत घोषित केल्यानंतर तरूणीच्या कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला. दररोज व्यायाम करणारी, अतिशय तंदुरुस्त आणि राज्यस्तरावर कुस्ती खेळणाऱ्या प्रतिभावान खेळाडूच्या अकाली निधनानंतर गावाभरातूनही शोक व्यक्त केला जात आहे.

प्राप्तीच्या अकाली जाण्याने तिवसा शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, अनेक क्रीडा प्रेमींनी आणि नागरिकांनी तिच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.