'बिग बॉस' फेम अभिनेता एजाज खान (Ajaz Khan) सध्या चांगलाच अडचणीत सापडला आहे. एजाज खानवर एका अभिनेत्रीने बलात्काराचा आरोप केला आहे. त्याच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एफआयआर दाखल झाल्यापासून एजाज खानचा मोबाईल फोन बंद येत आहे. तसेच तो गायब झाला आहे. तो कुठे आहे हे कोणाला माहित नाही. त्याच्या घरी देखील तो नाही. त्यामुळे पोलीस आता त्याला शोधत आहे.
अभिनेता खान विरोधात एका 30 वर्षीय अभिनेत्रीने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणात चारकोप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीसांनी एजाज खानविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. इंडस्ट्रीमध्ये काम देतो असे म्हणत एजाज खान अभिनेत्रीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार करायचा, असा आरोप तिने केला आहे. या प्रकरणात एजाज खानविरोधात बीएनएसच्या कलम ६४, ६४(२एम), ६९, ७४ अंतर्गत बलात्काराचा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीत सांगितले की, "एजाज खानने मला हाऊस अरेस्ट शोमध्ये होस्टिंग करण्यासाठी फोन केला होता. शूटिंग सुरू असताना एजाजने मला प्रपोज केला आणि मला धर्म बदलून लग्न करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर एजाजने माझ्या इच्छेविरुद्ध जाऊन मला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन माझ्यावर अनेक वेळा बलात्कार केला."
'हाऊस अरेस्ट' हा शो उल्लू या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतो. एजाज खान या शोचे होस्टिंग करत होता. आता'हाऊस अरेस्ट' शोवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. या शोचे काही अश्लील व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यामुळे 'हाऊस अरेस्ट' शोचे एपिसोड डिलीट करण्यात आले आहे. या प्रकारामुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. 'हाऊस अरेस्ट' शोमध्ये घडलेल्या प्रकाराविरोधात एजाज खान आणि उल्लू अँपचा एमडी अग्रवाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.