Maharashtra News Live Updates : Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्याच थैमान...
Saam TV May 06, 2025 11:45 PM
Buldhana News: मेहकर तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस...

बुलढाणा जिल्ह्यात काल मेहकर तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. . तालुक्यातील दुधा, रायपुर, ब्रम्हपुरी परिसरात ही गारपीट , आणि अवकाळी पाऊस झाला .. त्यामुळे परिसरात असलेल्या उन्हाळी मूग, उडीद, भुईमूग पिकांचे मोठे नुकसान झालेय ... उन्हाळी मुगाचे पीक झोपले असून गारींचा फटका बसल्याने मुंगाचे शेंगा काळया पडत आहेत .. परिणामी उत्पन्नात घट होणार आहे .. त्यामुळे तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय ....

Nagpur: नागपूरच्या गांधीबाग येथील कपड्याच्या दुकानाला आग

गांधी चौकातील नंगा पुतला जवळील एका कपड्याच्या दुकानाला आग लागण्याची माहिती

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ३ अग्निशमन गाड्या दाखल

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट मात्र तासभरापासून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

Jalna: जालना शहरात मोकाट कुत्र्याचा सात वर्षाच्या चिमुकलीवर हल्ला..

मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात संध्या पाटोळे या सात वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू..

जखमी अवस्थेत दवाखान्यात नेले असता उपचारापूर्वीच चिमुकलीचा मृत्यू..

जालना शहरातील गांधीनगर भागातील घटना...

10 ते 12 कुत्र्यांनी घरासमोर खेळणाऱ्या या चिमुकलीला ओढत नेत तिच्यावर हल्ला केला,..

आजूबाजूच्या नागरिकांनी हस्तक्षेप केला, तोपर्यंत मुलगी गंभीर जखमी झाली होती.. हॉस्पिटलमध्ये नेत असताना तिचा मृत्यू झाला

Nashik: नाशिक जिल्ह्यात ३ ठिकाणी होणार मॉक ड्रील

- नाशिक जिल्ह्यात ३ ठिकाणी होणार मॉक ड्रील

- नाशिक, मनमाड आणि सिन्नरमध्ये होणार मॉक ड्रील

- नाशिक, सिन्नरला असणाऱ्या लष्करी छावण्या, मनमाडला असणारा पेट्रोलियम डेपोमुळे ३ ठिकाणी होणार मॉक ड्रील

Nashik : नाशिकमध्ये गायींच्या खाण्यात विषबाधा होऊन ४६ गायींचा मृत्यू

खाण्यात विषबाधा होऊन गोठ्यातील 46 गाईंचा मृत्यू...

चारा विकणाऱ्या विरोधात आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...

नाशिकच्या आडगाव गावालगत असलेल्या रौंदळ डेअरी येथील चाऱ्यातून विष बाधा होऊन गोठ्यातील 46 गाई मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ही घटना केवळ आर्थिक नुकसानच नाही, तर शेतकऱ्यांच्या भावनांनाही जबर धक्का देणारी आहे....

Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यात वादळी वाऱ्याच थैमान....

काल मध्यरात्री वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाचा पाऊस....

वादळी वाऱ्यामुळे कैरी पिकाचे प्रचंड नुकसान....

खराब झालेल्या कैरीमुळे उत्पादन घट....

शेकडो हेक्टर वरील कैरीच नुकसान.....

कैरीपासून आमचुल तयार करण्याच्या उद्योगाला मोठा फटका...

शासनाला त्वरित पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी....

शेतकऱ्यांचा बांधावर जाऊन कैरीचा नुकसानी संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर निकवाडे....

भरधाव वेगाने जाणाऱ्या जेसीबी मशीनच्या धडकेत अपघातात सहा वर्षे मुलाचा दुर्दैवी मृत्यू

दुर्देवी दुर्घटनेत ऋषिकेश जयदेव खराडे या 6 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. घरून कोथिंबीर आणायला गेलेल्या या चिमुरड्याला भरधाव वेगात आलेल्या जे सी बी मशिन ने धडक दिली होती , मृत ऋषिकेश याच्या मावशीच्या फिर्यादि वरून पोलिसांनी जे सी बी चालक राहुल रामचंद्र जाधव याच्या विरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करत त्याला अटक ही केलीय.

न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी

- न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी सीआयडी चौकशी करण्याची मागणी

- प्रहार जनशक्ती पक्ष आणि ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात आली मागणी

- न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणी सीआयडी चौकशी केल्यास अनेक गूढ समोर येणार असल्याची माहिती

- स्थानिक पोलिसांच्या तपासानुसार सध्या हॉस्पिटल कर्मचारी मनीषा माने याच संशयाच्या भोवऱ्यात

- आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा माने या सध्या न्यायालयीन कोठडीत

- आत्महत्या प्रकरणी कुटुंबातील काही सदस्यांवर संशयाचे ढग असताना सुनबाई डॉ. शोनाली यांनी देश सोडल्याच्या चर्चांना उधाण

Rain: बेमौसमी पावसाचा कांद्यांना फटका

मेहुणबार चाळीसगाव गिरणा परिसरातील विशेषत वरखेडे, तिरपोळे . चाळीसगाव परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. वरखेडे येथे काही भागात अर्धा मिनिटे गारांचा पाऊस पडल्याच शेतकऱ्यांनी सांगितले. आजच्या पावसामुळे कांद्यांसह चवळी, ज्वारी, बाजरी, आंबा आदींचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

शिर्डीला गारपीट आणि अवकाळी पावसाने झोडपले -

काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपीट आणि अवकाळी पावसाने कोपरगाव, राहाता, राहुरी या तालुक्यांना चांगलाच तडाखा दिलाय.. काही ठिकाणी गारांचा सडा पडल्याचे बघायला मिळाले.. गारपिटीसह पावसाने झोडपल्याने फळ बागांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.. अनेक ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा भिजल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे..

India Vs Pakistan: भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभर होणार मॉक ड्रील

- उद्या ७ मे ला देशभर होणार मॉक ड्रील

- नाशिकमध्ये मॉक ड्रील संदर्भात जिल्हाधिकारी कार्यलयात घेतला जाणार आढावा

- आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेतला जाणार तयारीचा आढावा

- मॉक ड्रिल कुठे आणि केव्हा करायचे? या संदर्भात केली जाणार चर्चा

Jalna: जालन्यात अवकाळी पावसामुळे बीज कांदा पिकाचे आतोनात नुकसान....

जालन्यातील अंबड तालुक्यातील पानेगाव शिवारात काल झालेल्या बेमोसमी अवकाळी पावसामुळे बीज कांदा पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. एकीकडे जालना जिल्ह्यात पाण्याअभावी अनेक पिके संकटात सापडले आहे. तर काल झालेल्या अवकाळी पावसामुळे तोंडाशी आलेल्या पिकांची देखील प्रचंड नुकसान झाला आहे.

आरजीपीपीएल मधील चालकांचे पगार थकले

गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पातील वाहनांच्या ठेक्याची तीन महिन्यांची रक्कम न मिळाल्यामुळे चालकांचे पगार चार महिने थकले आहेत. रत्नागिरी वीज प्रकल्पातील विविध आस्थापनांमधील अधिकाऱ्यांसाठी 15 वाहने ठेकेदारी पद्धतीने घेण्यात आली आहेत. यामधील काही वाहने 24 तासांसाठी कंपनीत असतात. त्यामुळे चालकांची संख्या 24 आहे. हातावर पोट असलेल्या या चालकांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. या चालकांनी एकत्र पगार न दिल्यास कामावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला होता. त्यानंतर ठेकेदारांची धावपळ सुरू झाली होती. त्यांनी वाहन ठेक्याची चार महिन्यांपासून थकीत रक्कम तसेच अन्य दैनिक त्वरित देण्याची विनंती केली.

माळशिरस तालुक्यात नीरा उजवा कालवा फुटला...

कालव्यातून लाखो लीटर पाणी वाया...

माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे नीरा कालवा आज पहाटे अचानक फुटला....

कालवा फुटल्याने शेतात पाणीच पाणी ..

पंढरपूर,सांगोला तालुक्यातील शेतीचा पाणी पुरवठा बंद....

ऐन उन्हाळ्यात कालवा फुटल्याने शेतकरी पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता...

जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील कारला फाटा येथील कंटेनर जळून खाक...

जुन्या मुंबई पुणे महामार्गावरील कार्ला फाटा येथे कंटेनर जळून खाक झाला आहे. मात्र कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मुंबईकडून पुण्याच्या दिशेने जात असलेल्या या कंटेनरच्या केबिनमध्ये अचानक आग लागल्याने कंटेनर जाळून खाक झाला आहे. घटनास्थळी लोणावळा अग्निशमन दल आणि तळेगाव अग्निशामक दलाच्या जवानांना प्रचारण करण्यात आलेले आहे...

Bhandara: भंडाऱ्याचा खापा-खरबी शिवारात जंगली रानगव्यांचा वावर ...

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील खापा -खरबी गावालगतच्या शेतशिवारत जंगलातील वन्यप्राणी अन्न पाण्याच्या शोधात गावांकडे धाव घेत आहेत.असाच प्रकार जंगलातील रानगवे खापा-खरबी शिवारातील शेतात व बावनथडी कालव्याजवळ नागरीकांना दिसुन आले.सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने मानवासह वन्यप्राण्यांची तापलेल्या उन्हाने लाहीलाही होत आहे .परिणामी वन्य प्राणी अन्न व पाण्याच्या शोधात ज़गलातुन गावालगत असलेल्या हिरवेगार शेतीशिवारात चारा खाण्यासाठी व बावनथडी कालव्यातील पाण्याने तहान भागविण्यासाठी गावालगत येत आहेत.

Solapur News: सोलापूर जिल्ह्याच्या निकालात यंदा पाच टक्क्यांची घट

इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सोलापूर जिल्ह्याच्या निकालात यंदा तब्बल 5. 26 टक्क्यांनी घट झाली आहे. गतवर्षी जिल्ह्याचा निकाल 93.88% इतका होता. यंदा तो 88.62% लागला आहे. दरम्यान जिल्ह्यातील 222 कनिष्ठ महाविद्यालयांमधील 100 टक्के विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या परीक्षेत नेहमीप्रमाणे मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा एकूण निकाल 93.62% तर मुलांचा निकाल 84.64% लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्याच्या निकालाची टक्केवारी घसरली आहे.

त्र्यंबकेश्वरचा विकास आराखडा आज सादर होणार

- अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत त्र्यंबकेश्वरचा विकास आराखडा होणार सादर

- आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्र्यंबकेश्वरचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे दिले होते आदेश

- मागच्या महिन्यात त्र्यंबकेश्वरला तीर्थक्षेत्र अ वर्गाचा दर्जा देखील देण्यात आलाय

- आजच्या बैठकीत त्र्यंबकेश्वरच्या विकास आराखड्याबाबत काय निर्णय होतो, याकडे लक्ष

- आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमध्ये टप्प्याटप्प्याने विकास कामं करण्याचा झालाय निर्णय

Buldhana: राहुड फाट्यावर डंपरणे दुचाकीस्वारास चिरडले,युवकाचा जागीच मृत्यू,

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्या तील पिंपळगाव रोड वरती राहुल फाटा ते पिंपळगाव राजा तांदुळवाडी फाट्या वर भीषण अपघात झाला आहे. या ठिकाणी डंपर ने एका दुचाकी स्वाराला चिराडल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. गोविंद रामचंद्र टावरी वय 26 राहणार खामगाव असे अपघातातील मृतकाचे नाव असून तो मुंबईला राहतो.. तो गावाकडे आल्यानंतर आज सकाळी तो दुचाकीने आपल्या शेतात जात असताना अपघात घडला....

Nagpur News: नागपुरातील शिक्षण भरती घोटाळा प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल..

- प्रकरणाची व्याप्ती राज्यभर असून तपासून कारवाई करण्याचा सूचना देत सहसंचालक दर्जाचा अधिकाऱ्याकडून चौकशीचे आदेश

- आमदार संदीप जोशी यांनी मुख्यमंत्री यांना यासाठी चौकशीची मागणी केली होती.

- त्या पदावर मुख्यमंत्री यांनी दाखल घेत प्रकरणातील तपासून कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहे.

- शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्या कक्ष अधिकारी निशा महाजन यांनी शिक्षण आयुक्त पुणे यांना पत्र देऊन कळवल आहे.

- या संदर्भात प्रचलित शासन नियम तरतुदीनुसार सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करत कारवाई करण्याचा सूचना... अहवाल शासनाला सादर करण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहे.

- सहसंचालक दर्जाच्या अधिकारी या प्रकरणात काय चौकशी करून कारवाई करण्यात याकडे लक्ष मात्र एसआयटीची मागणी होत असताना ती केव्हा लागेल असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Beed: बीडमध्ये चक्क पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानीच ओढत होता कर्मचारी गांजा

पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या शासकीय निवासस्थानाचे काम सुरू आहे आणि याच निवासस्थानी पोलीस कर्मचारी बाळू गहिनीनाथ बहिरवाळ हा गांजाची नशा करत असताना निदर्शनास आले यानंतर या कर्मचाऱ्यास शिवाजीनगर पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात नेले असता अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्यावरती बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Shivsena: शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाचे? उद्या सुनावणी होणार

शिवसेना पक्ष कुणाचा आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाचे यावर ७ मे रोजी सुनावणी होणार आहे.

सप्टेंबर २०२३ म्हणजे दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

एखादी केस लावून घेणे महत्वाचे वैगेरे ऐकले होते पण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात यादीवर आणणे किती मोठे दिव्य असते हे यावेळी अनुभवले. इतके करूनही शिवसेनेची पिटिशन 43 क्रमांकावर लागलेली आहे त्यामुळे 7 तारखेला सुनावणी घ्या असे कोर्टासमोर उभे राहून सिनिअर कौन्सिल ने मुद्दाम मेन्शन केले पाहिजे.

पुण्याच्या भोरमधील उत्रौली गावात सुकलेल्या गवताला अचानक आग

पुण्याच्या भोरमधील उत्रौली गावात सुकलेल्या गवताला अचानक आग लागल्याची घटना..आगीत शेतीपुरक साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी

या आगीत शेतकरी धर्मेंद्र विलास शिंदे यांची शेतीची औजारे, दोन कडबाची गंजी यात ९०० कडबा, लाकडे,घराची लाकडे,औत, शेणखत,गव-या असे घराशेजारी ठेवलेल सामान जळून खाक झाल्याने ६० हजार रुपा्यांचे नुकसान झाले..

तर शेतकरी रुपाली गुलाब शिंदे यांचे केसरी आंबे,चिकू, दोन पेरुची झाडे जळून ४० हजार रुपयांचे नुकसान झाले

आगीचं कारण अद्याप असष्ट.

शंभर टक्के निकालात पुणे आघाडीवर

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या बारावीच्या निकालात १ हजार ९२९ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के, तर ३८ महाविद्यालयांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.

विशेष म्हणजे,पुणे विभागात सर्वाधिक ३१० महाविद्यालयांचा १०० टक्के निकाल लागला असून, सर्वांत कमी ९२ महाविद्यालये लातूर विभागात आहेत.

बारावीच्या परीक्षेसाठी राज्यातील एकूण १४,४९६ महाविद्यालयांनी नोंदणी केली होती. त्यात १६ महाविद्यालयांचा निकाल १ ते १० टक्के, ४३ महाविद्यालयांचा १० ते २० टक्के, ६२ महाविद्यालयांचा २० ते ३० टक्के, १०७ महाविद्यालयांचा ३० ते ४० टक्के, १७८ महाविद्यालयांचा ४० ते ५० टक्के, २८५ महाविद्यालयांचा ५० ते ६० टक्के, ५०४ महाविद्यालयांचा ६० ते ७० टक्के, ९६६ महाविद्यालयांचा ७० ते ८० टक्के, १,८०६ महाविद्यालयांचा ८० ते ९० टक्के, तर ४,५६२ महाविद्यालयांचा निकाल ९० ते ९९.९९ टक्के लागला.

महाराष्ट्राला दोन दिवसाचा यलो अलर्ट, पुणे वेधशाळेचा अंदाज

राज्यात दोन दिवसाचा येलो अलर्ट

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये 6 आणि 7 मे रोजी जोरदार पावसाचा पुणे वेधशाळेचा अंदाज

पुढील 48 तास राज्यात सर्वंत्र वादळी-वाऱ्यासह गारपीटीचा पुणे वेध शाळेकडून इशारा

देशात जम्मू कश्मीर ते तामिळनाडूपर्यंतच्या राज्यांत उद्यापासून पाऊस सुरु होत असून वादळीवारे अन् गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला देखील येलो अलर्ट

यवतमाळ जिल्ह्याला ५ दिवस अलर्ट जारी, उष्णतेच्या लाटेसह वादळ वारा आणि पावसाचा अंदाज

हवामान विभागाने उष्णतेच्या लाटेसह वादळ, वारा आणि पावसाचा अंदाज वर्तविला आहे. पुढील पाच दिवस हे चित्र कायम राहणार असल्याचे म्हटले आहे.यामुळे यवतमाळ जिल्ह्यात दहा मे पर्यंत शेतकऱ्यांना सतर्कता बाळगावी लागणार आहे.शेतशिवारामध्ये तीळ, ज्वारी, मुंग, आंबा, भाजीपाला फुलशेती, भुईमुंग आहे. यातील तीळ, ज्वारी आणि मुंग ही पिके काढणीच्या अवस्थेत आहे.याचवेळी दाखल झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाचा अंदाज घेऊन काढणीला आलेला पीक संरक्षित करावे अशा सूचना कृषी विभागाकडून देण्यात आल्या आहे.

पुणे शहरातील अतिक्रमणांवरील कारवाईचा अहवाल देण आता बंधनकारक

महापालिका आयुक्त यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

पुणे शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर स्वतः आयुक्त ठेवणार लक्ष

शहरातील वाढत्या अतिक्रमणावर कारवाई करत सविस्तर अहवाल आयुक्तांना दररोज देणे आता अधिकाऱ्यांना बंधनकारक

शहरातील अतिक्रमणांची संख्या वाढत असून, नागरिकांना पदपथांवरून चालणे अवघड झाले आहे. महापालिकेने कारवाईसाठी अनेक ठिकाणी स्थिर तसेच फिरती पथकेही नियुक्त केली आहेत.

मात्र, तरीही अतिक्रमणे होत असल्याने चित्र आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील अतिक्रमणांविरोधात सातत्यपूर्ण कारवाई करा, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत

नक्षलवाद्यांशी संबंधित फरार आरोपीला पुण्यात अटक

नक्षलवाद्यांशी संबंधित गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला कुख्यात आरोपी प्रशांत जालिंदर कांबळे ऊर्फ 'लॅपटॉप' खालापूर तालुक्यातील डोणवत गावात सुनील जगताप' या बनावट नावाने राहत होता. आदिवासी पाड्यांमध्ये मुलांना शिकवण्याचे ढोंग करत आपली खरी ओळख लपवत होता. मात्र पुणे एटीएस युनिटने अत्यंत गुप्त पद्धतीने माहिती मिळवून 3 मे रोजी त्याच्यावर सापळा रचून त्याला ताब्यात घेतले आणि ४ मे रोजी अधिकृतपणे अटक केली आहे.

करमाळयात पिस्तुलाचा धाक दाखवून खंडणी मागणार्या दोघांना अटक

करमाळा येथील एका व्यवसायिकाला पिस्तुल व तलवारीचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या दोघांना करमाळा पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी जयवर्धन उर्फ मुन्ना दैन व प्रदीप पोळ याच्या विरोधात करमाळा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. वांगी येथील अभयसिंह बाळासाहेब देशमुख यांना आरोपींनी पिस्तुल आणि तलवारीचा धाक दाखवून खंडणी मागितली होती. तक्रारी नंतर पोलिसांनी एक पिस्तुल, पुंगी,तलवार आणि स्कार्पिओ गाडी जप्त केली आहे.

अकोल्यात वादळी वार्यासह पावसाची हजेरी

अकोला जिल्ह्यात काही तालुक्याला वादळी वाऱ्याचा जोरदार फटका बसला. बार्शीटाकळी आणि तेल्हारा परिसरात जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे रस्त्यावर कोसळली, तर तेल्हारा तालुक्यात केळीच्या बागा जोराच्या वाऱ्यामुळे कोसळल्या आहे.. अनेक केळी उत्पादक शेतकऱ्याच मोठं नुकसान झालं आहे.

तर बार्शीटाकळी महान रस्त्यावर वाऱ्यामुळं झाडे रस्त्यावर कोसळली होती... त्यामुळं वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता. या परिस्थितीत काही युवकांनी पुढाकार घेत झाडांच्या फांद्या हटवून वाहतूकीचा रस्ता मोकळा करण्यासाठी मदत केली.

कुळाचे नाव कमी करण्यासाठी ४ हजारांची लाच स्वीकारताना तलाठी व खाजगी लिपिक अटक

कुळाचे नाव कमी करण्यासाठी तक्रार दाराकडुन ५ हजार रुपये लाचेची मागणी करुन ४ हजार रुपये स्विकारताना तलाठी व खाजगी लिपिकास धाराशिव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.धाराशिव तालुक्यातील वाघोली गावचे तलाठी भुषण वशिष्ट चोबे व खाजगी लिपिक भारत मगर यांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वादळी वाऱ्याचे थैमान. वादळी वाऱ्यामुळे पार्किंग मध्ये लावलेल्या वाहनांवर झाडे पडल्याने मोठे नुकसान

हवामान खात्याने दिलेल्या इशारानुसार नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्याने थैमान घातले. काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले. नांदेड शहरात अनेक ठिकाणी पार्किंग मध्ये लावलेल्या वाहनांवर झाडे कोसळल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. तर जिल्ह्यातील फळबागांचे देखील या वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी घरावरची पत्रे देखील उडून गेली आहेत. जिल्ह्यात कुठेही पाऊस पडला नसला तरी वादळी वाऱ्याने वाऱ्याने मात्र मोठे थैमान घातले.

अकरावीचे प्रवेश यंदा ऑनलाइनच होणार

महानगरपालिका क्षेत्रांसह आता ग्रामीण भागातील इयत्ता अकरावीचे प्रवेश देखील ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत.राज्य सरकारकडून यासंदर्भातील शासन निर्णय यापूर्वीच निघाला आहे.मात्र याला शिक्षक संघटनांनी विरोध दर्शवला होता. मात्र त्यानंतर यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना धडकल्याने हे प्रवेश आता ऑनलाइन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.या प्रवेश प्रक्रियेत दहावीच्या विद्यार्थ्यांना निकाल लागण्याआधी आणि निकाल लागल्यानंतर अशी दोन वेळा नोंदणी करावी लागणार आहे. शिवाय इयत्ता बारावीसाठीही ऑनलाईन प्रवेश प्रक्रियाच ग्राह्य धरण्यात येणार असल्याने इतर मार्गाने प्रवेश घेण्याचा कोणीही प्रयत्न करू नये असे आवाहन धाराशिव शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे. या प्रवेश प्रक्रियेसाठी मदत केंद्र उभारण्यात येणार आहेत.

उरणमध्ये भाजपाची ताकत वाढणार; शेकापाचे नेते म्हात्रेसह १५ नगरसेवक करणार भाजपात प्रवेश

शेतकरी कामगार पक्षाला पनवेल उरण खालापूर मध्ये मोठा धक्का बसला आहे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते पनवेल महानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक 15 यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच भारतीय जनता पार्टीमध्ये सात मे रोजी पक्ष प्रवेश करत आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला हा मोठा धक्का बसलाय.

मानवनिर्मित पाणी कपात मागे घ्या, मनसेची पुणे आयुक्तांकडे मागणी

दक्षिण पुण्यात नागरिकांवर लादलेली पाणीकपात ही नैसर्गिक आपत्ती नसून, मानवनिर्मित आहे.

पाणीगळती, चोरी आणि प्रशासनाच्या नियंत्रणाच्या अभावामुळे कृत्रिम टंचाईचा बोजा सामान्य जनतेवर टाकला जात आहे. ही अन्यायकारक पाणीकपात त्वरित मागे घ्यावी अन्यथा आंदोलन केले जाईल अशा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने दिला.

उड्डाण पुलावरून नागरिकांचा उलट प्रवास,सिंहगड रस्त्यावरील प्रकार

सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पुलावर वाहतूक कोंडी झाल्यामुळे नागरिकांनी चक्क यू टर्न घेऊन उड्डाण पुलावरून विरुद्ध दिशेने प्रवास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे महापालिकेने सिंहगड रस्त्यावर विठ्ठलवाडी कमान च्या दरम्यान दोन किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल बांधला आहे.या उड्डाणपुलाचे उद्घाटन एक मे रोजी झाल्यानंतर आहे त्यानंतर या उड्डाणपुलाचा वापर करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.