उरी आणि पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्यानंतर भारताने आता पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याने मध्यरात्री दीड वाजता पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पण आता ज्योतिषशास्त्रानुसार, पाकिस्तानासाठी येणारे दिवस आणखी कठीण असणार आहेत. पाकिस्तानचे तुकडे पडू शकतात, असे योग ज्योतिष्यात दिसत आहेत. तर दुसरीकडे भारताच्या कुंडलीतील योगांनुसार सप्टेंबर महिन्यात भारताची किर्ती आणखी वाढणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, पाकिस्तानच्या कुंडलीत सध्या शुक्रची अंतर्दशा आणि चंद्राची महादशा सुरू आहे. यासोबतच, शुक्र मारकेश होऊन पाकिस्तानला नष्ट करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे, लवकरच पाकिस्तान जगाच्या नकाशावरून पूर्णपणे मिटलेला असेल, अशी शक्यता ज्योतिषांनी वर्तवली आहे. येत्या १४ मे नंतर गुरुचे मिथुन राशीत गोचर होणार आहे. गुरुचे गोचर मिथुन राशीत होताच पाकिस्तानच्या कुंडलीत अंग-भंग नावाचा योग तयार होईल. हा योग पाकिस्तानला नष्ट करू शकतो.
तसेच गुरु आणि बृहस्पतीचे अतिचारी असणे पाकिस्तानसाठी अत्यंत धोकादायक ठरू शकते. पंचग्रही योग आणि कालसर्प योगाच्या प्रभावामुळे पाकिस्तानला मोठे नुकसान सोसावे लागेल. मंगळाच्या महादशेत मंगळाची अंतर्दशा आहे, त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील संबंध आणखी बिघडतील. मंगळ हा क्रोध आणि रक्ताचा कारक मानला जातो. त्यामुळे या स्थितीत पाकिस्तानची भूमी रक्ताने लाल होऊ शकते, असा अंदाज ज्योतिषांनी वर्तवला आहे. येत्या १ सप्टेंबर २०२५ पूर्वीच पाकिस्तानचे दोन तुकडे होण्याची शक्यताही ज्योतिषांनी वर्तवली आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, लवकरच पाकिस्तानच्या कुंडलीत खप्पड योग नावाचा एक अत्यंत धोकादायक योग तयार होत आहे. हा योग पाकिस्तानसाठी मोठे संकट उभे करेल. इतकेच नव्हे, तर हा योग इतका प्रभावी आहे की त्याच्या प्रभावामुळे महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामुळे पाकिस्तानचा पूर्णपणे विनाश होईल.
तर दुसरीकडे, भारताची कुंडली वृषभ लग्न अशी आहे. भारताच्या कुंडलीत सध्या सूर्याची अंतर्दशा सुरू आहे आणि सूर्य कुंडलीतील चौथ्या विभागाचा स्वामी आहे. यासोबतच, चंद्राच्या दशेत सूर्याची अंतर्दशा भारताच्या कुंडलीत आहे. त्यामुळे, सप्टेंबर २०२५ मध्ये भारताची किर्ती आणखी वाढेल. हा काळ भारतासाठी भाग्योदयाचा असेल. भारताच्या जमिनीचे क्षेत्रफळ वाढेल. भारताची मकर रास आहे. सध्या भारतासाठी ग्रहांची स्थिती अत्यंत अनुकूल आणि सकारात्मक आहे. मे महिन्यात ३ मोठे ग्रह आपल्या चालीत बदल करणार आहेत. ग्रहांची ही स्थिती पाकिस्तानला भयानक आर्थिक आणि लष्करी संकटात टाकणार आहे. तर भारतासाठी ही मजबूत स्थिती असेल, असे संकेत ज्योतिषांनी दिले आहे.