पाली : रायगड जिल्ह्यातील तळा येथे तळा मांदाड रस्त्यावर गुरुवारी (ता. 8) एसटी बस व डंपर चा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तब्बल चार प्रवाश्यांचा जागीच मृत्यू झाला असून 20 प्रवासी गंभीर जखमी आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की रहाटाड वरून तळा जाण्यासाठी एसटी बस वर येत होती आणि एक डंपर सुसाट वेगाने समोरून खाली येत होता. हा समोरून येणारा डंपर नियंत्रण सुटल्याने एसटीला जोरदार धडकला.
त्यामुळे मोठा अपघात झाला आहे. मृतांमध्ये खांबवली, रहाटाड, रहाटाडवाडी, धनगर वाडी येथील प्रवाशांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.