Bhishma tank features : भारतीय लष्कराचं 'भीष्म' बनलं 'अभेद्य'! जाणून घ्या याच्या अफाट क्षमता
Sarkarnama May 10, 2025 01:45 AM
T 90 main bhism battle tank indian army 'ऑपरेशन सिंदुर'

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात करत 'ऑपरेशन सिंदुर' पार पाडले.

T 90 main bhism battle tank indian army भारत-पाकिस्तान तणाव

भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. या त्यांच्या नापाक कृत्याला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने केलेले ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले भारतीय संरक्षण यंत्रणेने हवेतच उद्ध्वस्त केले. 

T 90 main bhism battle tank indian army सुरक्षा वाढवली

या पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराने आपल्या टँक आणि इतर सैन्य उपकरणांवर एंटी-ड्रोन संरक्षण प्रणालींचा समावेश करून सुरक्षा वाढवली आहे. T-90 भीष्म टँकवरील कोप केज याचेच उदाहरण आहे, ज्यामुळे टँक ड्रोन हल्ल्यांपासून अधिक सुरक्षित झाला आहे.

T 90 main bhism battle tank indian army T-90 भीष्म टँकचे वैशिष्ट्ये

टॉप अटॅक प्रोटेक्शन केज (TAPC) हा केज टँकच्या वरच्या भागावर बसवला जातो, ज्यामुळे आत्मघाती ड्रोन, अँटी-टँक क्षेपणास्त्रे, ग्रेनेड आणि हेलिकॉप्टरच्या गोळ्यांपासून संरक्षण मिळते.

T 90 main bhism battle tank indian army कोप केजची रचना

या केजमध्ये मेटल ग्रिड आणि वेव्ही मेटल कव्हरिंग असते, जे टँकच्या टॉवरला विविध हवाई हल्ल्यांपासून सुरक्षित ठेवते. साइड्सवर मेश लावून साइड-टॉवर हल्ल्यांपासूनही संरक्षण मिळते.

T 90 main bhism battle tank indian army ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षण

हा केज विशेषतः लहान ड्रोन आणि क्वाडकॉप्टर्सच्या हल्ल्यांपासून संरक्षण देतो, जे ग्रेनेड किंवा स्फोटके टाकू शकतात. अशा प्रकारचे केज रशिया-युक्रेन युद्धात रशियन टँकांवर आणि इस्रायली टँकांवरही पाहायला मिळाले आहेत.

T 90 main bhism battle tank indian army भारतीय लष्कराची सुधारणा

भारतीय लष्कराने पूर्वीच्या "जुगाड" केजच्या तुलनेत अधिक मजबूत आणि चांगल्या डिझाइनचा कोप केज वापरण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे टँकची युद्धक्षमता आणि टिकाव वाढतो.

T 90 main bhism battle tank indian army T-90 भीष्म टँकची तांत्रिक वैशिष्ट्ये
  • गन: 125 मिमी स्मूथबोर गन

  • गती: 60 किमी/तास

  • ऑपरेशनल रेंज: 550 किमी

  • गोळ्यांची क्षमता: 43 गोळे स्टोअर करता येतात

  • क्रू: 3 सदस्य

  • Next : पाकिस्तानची नवी कारस्थानं 'Dance of the Hillary', फाईलवर क्लिक केला तर होईल मोठा घात; नेमका काय आहे हा व्हायरस ?
    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.