Dangerous Stunt Video: सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये एका तरुणाने केलेली जीवघेणी स्टंटबाजी पाहून नेटकरी अक्षरशः हादरले आहेत. हा सर्व थरारक प्रकार एका रेल्वे पुलावर घडलेला असून, त्या तरुणाने आधी पुलावरून लटकण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर जवळच्या विजेच्या तारेवर अडकून राहिला आणि शेवटी तो थेट रेल्वेच्या रूळांवर कोसळल्याचं दिसून येत आहे. हे दृश्य इतकं धक्कादायक आहे की पाहणाऱ्यांचा क्षणभर श्वास रोखून धरला जातो.
नेमके घडले तरी काय?संपूर्ण प्रकार पुलाखाली असलेल्या एक व्यक्तीने कॅमेऱ्यात केला आहे आणि जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला आहे. या (Viral) व्हिडिओमध्ये दिसतं की, एक तरुण उंच अशा पुलाला लटकलेला आहे. तो स्वत:ला तिथून सोडवण्याचा प्रयत्न करतो मात्र त्याचा पुलावरुन सटकून तो खाली असलेल्या विद्युत तारांवर अडकतो. तारांवर अडकल्यानंतर अवघ्या काही सेकंदाने तो तोल जाऊन थेट रेल्वे रुळांवर कोसळतो.
सुदैवाने त्या क्षणी रेल्वे रुळावरुन कोणतीही रेल्वे तिकडे येत नव्हती, त्यामुळे मोठा अपघात होता होता टळला आहे. मात्र, हा प्रकार अतिशय धोकादायक होता आणि त्यात त्या तरुणाचा जीव जाऊ शकत होता. पण हा तरुण पुलावर कसा लटकला आणि त्याचे नाव काय ते अद्याप समजू शकलेले नाही.
(Video) पाहिल्यानंतर तो अत्यंत वेगाने नागरिकांमध्ये पाहिला गेला आहे आणि त्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया आलेल्या आहेत. एका यूजरने म्हटलं,''मस्ती बोलतात याला'' दुसऱ्या यूजरने म्हटलं की,''त्याला चुकूनही कोणी वाचऊ नका'' तर अजून एका यूजरने म्हटलं,''पोलिसाने चांगलाच चोपला पाहिजे'' अशा प्रकारे प्रत्येकाने संतापजनक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.
टीप : हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याची पडताळणी झालेली नाही. फक्त माहिती म्हणून आम्ही वाचक-प्रेक्षकांपर्यंत ही बाब पोहचवत आहोत. याचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही.