इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) फाइल करण्याची अंतिम मुदत कधी आहे? असा प्रश्न नेहमीच सर्वांना पडत असतो.
ITR फाइल करण्यासाठीची मुदत वाढवण्यात येणार का अशी विचारणा करदात्यांकडून नेहमी केली जाते. तसेच नवी मुदत काय असेल याबाबतही उत्सुकता असते.
आयकर विभागाकडून 2025-26 या आर्थिक वर्षासाठी आयटीआर 1 ते 7 पर्यंत असे सर्वच्या सर्व सात इन्कम टॅक्स रिटर्न फॉर्म प्रसिध्द केले आहेत.
आयकर विभागाने 2024-25 या आर्थिक वर्षासाठी किंवा असेसमेंट इयर 2025-26 (AY 2025-26) साठी रिटर्न सादर करण्याची मुदत आता 15 सप्टेंबर 2025 करण्याचा निर्णय घेतला आहे.
करदात्याला काही कारणास्तव 15 सप्टेंबर किंवा त्यापूर्वी रिटर्न फाइल करता आले नाही, तरीही रिटर्न फाइल करता येणार आहे. मात्र, त्यासाठी विलंब शुल्क भरावे लागणार आहे.
इन्कम टॅक्स विभागाकडून मंगळवारी(ता.27) परिपत्रकाद्वारे टॅक्स रिटर्न सादर करण्याची नवी मुदत जाहीर करण्यात आली आहे.
यंदा नव्या ITR फॉर्ममध्ये अनेक महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.
नव्या माहितीनुसार, विलंब शुल्कासह 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 31 डिसेंबर 2025 पर्यंत रिटर्न फाइल सादर करता येणार आहे. करदात्यांसाठी मोठा दिलासा असणार आहे.