पाकिस्तानची नॅशनल कमांड अथॉरिटी (एनसीए) त्यांच्या देशातील सर्वात उच्च नागरिक आणि सैन्य संस्था आहे. पाकिस्तानात NCA कडे अणवस्त्र कार्यक्रम आणि रणनितीक संपत्तीच्या कमांड नियंत्रण संचालनाचा अधिकार आहे. सोप्या शब्दात निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानची नॅशनल कमांड अथॉरिटीची बैठक बोलावली आहे. भारतासोबत निर्माण झालेला तणाव आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील या सर्वोच्च संस्थेने बैठक बोलवली आहे. फेब्रवारी 2000 मध्ये पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने NCA ची स्थापना केली होती. इस्लामाबादमध्ये याच मुख्यालय आहे. पाकिस्तानची संरक्षण निती आणि क्षेत्रीय स्थिरतेमध्ये NCA ची महत्त्वाची भूमिका आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी 9 मे 2025 रोजी NCA ची बैठक बोलावली होती. भारतासोबत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची होती. ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने 7 मे रोजी पाकिस्तानातील दहशतवादी तळ नष्ट केले. 8 मे रोजी लाहोरमध्ये पाकिस्तानची HQ-9 एअर डिफेन्स सिस्टिम नष्ट केली.
बैठक का बोलावली?
पाकिस्तानने काल रात्री फतेह-1 मिसाइल डागलं. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने हे मिसाइल हवेतच नष्ट केलं. NCA ची बैठक पाकिस्तानच्या अण्विक आणि मिसाइल रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आणि कसं प्रत्युत्तर द्यायचं यावर चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आल्याची शक्यता आहे.
NCA वर मुख्य जबाबदारी काय?
अणवस्त्र आणि मिसाइल धोरणावर निर्णय घेणं.
अणवस्त्र आणि मिसाइल कार्यक्रमांवर लक्ष ठेवणं.
NCA चे अध्यक्ष आणि सदस्य कोण?
अध्यक्ष – पाकिस्तानी पंतप्रधान
परराष्ट्र मंत्री: इशाक डार
गृह मंत्री: मोहसिन रजा नकवी
वित्त मंत्री: मुहम्मद औरंगजेब
संरक्षण मंत्री: ख्वाजा मुहम्मद आसिफ
चीफ ऑफ जॉइंट स्टाफ कमेटी : जनरल सहिर शमशाद मिर्जा
सैन्य प्रमुख : जनरल असिम मुनीर
नौदल प्रमुख : एडमिरल नवेद अशरफ
एअरफोर्स चीफ : एअर चीफ मार्शल जहीर अहमद बाबर