टीम इंडियाला जून महिन्यात इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. यासाठी भारतीय खेळाडू इंग्लंडचा दौरा करतील. याआधी रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर बीसीसीआय कर्णधार पदासाठी योग्य खेळाडूच्या शोधात आहे. आता रोहित शर्मानंतर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोण असेल? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तत्पूर्वी भारतीय कसोटी संघासाठी नवीन कर्णधाराची घोषणा कधी केली जाईल? या संबंधित एक मोठी अपडेट आली आहे.
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, नवीन कर्णधाराची घोषणा 23 मे रोजी केली जाईल. बीसीसीआयने नवीन कर्णधाराची घोषणा करण्यासाठी मीडिया पत्रकार परिषद देखील आयोजित केली आहे.
शुबमन गिल पुढचा भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार होऊ शकतो, या चर्चांना उधाण आलेलं आहे. भारतीय संघाच्या नव्या कसोटी कर्णधाराची घोषणा 23 किंवा 24 मे रोजी केली जाणार आहे. त्या संबंधित शुबमन गिलने या पूर्वीच अजित आगरकर व गौतम गंभीर यांची भविष्यातील प्लॅन्स संदर्भात भेट घेतली आहे.