उन्हाळ्यात डिहायड्रेशन किंवा इतर समस्यांचा त्रास होणे सामान्य आहे. त्यामुळे या ऋतूत चुकूनही पाण्याची कमतरता भासणार नाही यांची काळजी घेणे फार महत्वाचे आहे. कारण तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता जाणवली तर तुम्हाला उष्माघाताची समस्या देखील उद्भवते. उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी अनेक नैसर्गिक पद्धती वापरल्या जातात, त्यापैकी एक म्हणजे गोंड कतीरा खाणे. हे एक पौष्टिकतेने समृद्ध पदार्थ आहे जे वजनाने हलके आहे आणि अनेक फायदे प्रदान करते. पाण्यात भिजवलेले गोंड कतीरा प्यायल्याने दुहेरी फायदे होतात. म्हणून, उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही गोंड कतीरापासून अनेक पेय बनवून त्याचे सेवन करू शकतात.
खरंतर गोंड कतीराशी संबंधित घरगुती उपाय सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पेय बनवणे आणि ते पिणे. या लेखात आम्ही तुम्हाला अशा सोप्या गोंड कतीरा पेयांबद्दल सांगणार आहोत जे आरोग्यदायी तसेच चविष्ट आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घ्या
गोंड कतीरा आणि दूध शरबत
उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्यदायी पेय बनवण्यासाठी तुम्ही गोंड कतीरा व दुधाचा सरबत बनवून पिऊ शकतात. यासाठी तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या आणि वेलची देखील लागेल. गोंड कतीरा एक ग्लास पाण्यात टाकून भिजत ठेवा. नंतर ते भिजल्यावर पाणी काढून टाका आणि गाळून घ्या. आता एका भांड्यात दूध आणि पाणी नीट मिसळा, त्यात साखर आणि रोज सिरप टाका आणि हे मिश्रण चांगले मिक्स करा, नंतर त्यात गोंड कतीरा आणि वेलची टाका. शेवटी बर्फाचे तुकडे त्यात टाकुन नंतर थंडगार सर्व्ह करा.
गोंड कतीरा नारळ पेय
गोंड कतीरा रात्रभर पाण्यात भिजवा. आता एका ग्लासमध्ये नारळाचे पाणी घेऊन नंतर त्यात नारळाची क्रीम, गोंड कतीरा, लिंबाचे तुकडे हे सर्व प्रकार ब्लेंडरमध्ये एकत्र करा. आता तयार झालेल्या हेल्दी सरबत मध्ये नारळाचे तुकडे टाकुन सर्व्ह करा.
गोंड कटिरा मँगो शेक
प्रथम गोंड कटिरा रात्रभर पाण्यात भिजवा, नंतर आंब्याचे छोटे तुकडे करा आणि गोंड कटिरा, आंबा, दूध, चिया बियाणे आणि काजू ब्लेंडरमध्ये चांगले मिक्स करा. आता हे शेक एका ग्लासमध्ये टाकून त्यात बर्फ आणि केशर टाका आणि मिक्स करून थंडगार सरबताचा अस्वाद घ्या.
या लेखात आम्ही तुम्हाला गोंड कटिरा पासून उत्कृष्ट शेक किंवा पेये कशी बनवता येतील हे सांगितले आहे जे तुमच्या आरोग्यासाठी तसेच तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)