उन्हाळ्यात ‘हे’ पाच प्रकारचे पदार्थ खाऊ नका, वाढू शकतो उष्माघाताचा धोका
GH News May 11, 2025 06:08 PM

उन्हाळ्यातील तीव्र सूर्यप्रकाशामुळे आपल्याला डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. अशातच जेव्हा अधिक उष्ण वारे वाहतात तेव्हा त्या दिवसात ते प्रत्येकाच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. कारण यामुळे आपल्या उष्मघाताचा त्रास होऊ शकतो. यासाठी उष्माघात टाळण्यासाठी, थंडावा देणारे पाणीयुक्त पदार्थ आहारात समाविष्ट करावेत. कारण उष्मघाताचा मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांसाठी धोकादायक असू शकतो, त्यामुळे खबरदारी घेतली पाहिजे. विशेषतः आहाराकडे जास्तीत जास्त लक्ष देणे आवश्यक आहे. हेच कारण आहे की लोकं निरोगी राहण्यासाठी उन्हाळ्यात काकडी, कांदा, कलिंगड, इत्यादी पदार्थ जास्त खातात, परंतु याव्यतिरिक्त असे काही पदार्थ आहेत ज्यांच्या सेवनाने शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होऊ शकते आणि तुम्ही डिहायड्रेशनचा बळी होऊ शकता, ज्यामुळे उष्माघाताचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

जेव्हा एखाद्याला उष्माघात होतो तेव्हा जलद श्वास घेणे, अस्वस्थता, शरीराचे तापमान वाढणे, उलट्या होणे, मळमळ होणे, अतिसार, चक्कर येणे अशी लक्षणे दिसतात, ज्याकडे दुर्लक्ष करू नये. उष्माघात टाळण्यासाठी, शक्य तितके कमी उन्हात बाहेर जाणे आणि योग्य आहार घेणे महत्वाचे आहे. तुमच्या शरीराला डिहायड्रेट करणारे कोणते पदार्थ आहेत ते आपण आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत.

कोल्ड्रिंक्स शरीराला डिहायड्रेट करतात

उन्हाळ्याच्या दिवसात लोकं थंड पेये खूप पितात, कारण ते त्वरित शरीराला आराम देतात. जर तुम्हीही अशा लोकांपैकी असाल ज्यांना उन्हाळ्यात दररोज कोल्ड्रिंक्स पिणे आवडते, तर हे जाणून घ्या की तुमचे शरीर हायड्रेट होण्याऐवजी डिहायड्रेट होईल आणि उष्माघाताचा धोका वाढेल.

कॅफिन असलेल्या गोष्टी

अनेकदा चहा आणि कॉफी प्रेमी असे म्हणत असतात की तापमान कितीही वाढले तरी ते चहा आणि कॉफी सोडू शकत नाहीत. चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते जे शरीराला डिहायड्रेट करू शकते, म्हणून उन्हाळ्यात चहा आणि कॉफीचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.

जास्त मीठ असलेले अन्न

निरोगी राहण्यासाठी मर्यादित प्रमाणात मीठ खाण्याचा सल्ला दिला जातो. लोकं जेवणात मीठ मर्यादित ठेवतात पण जेवणाच्या वेळी ते चिप्स आणि नमकीन सारखे पॅकबंद पदार्थ खातात. या सर्व गोष्टींमध्ये मीठाचे प्रमाण खूप जास्त असते आणि त्यामुळे तुमचे शरीर डिहायड्रेट होऊ शकते. शरीरात सोडियमचे प्रमाण कमी होईल याची खात्री करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

तळलेले पदार्थ

उन्हाळ्यात तळलेले पदार्थांचे सेवन देखील टाळावेत. हे पदार्थ पचायला जड असतात. यामुळे पोटात जडपणा जाणवतो आणि डिहायड्रेशन देखील होऊ शकते. खरं तर, फॅट पचवण्यासाठी शरीराला भरपूर पाण्याची आवश्यकता असते.

मसालेदार तेलकट पदार्थ

उन्हाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात लोणचे, मांसाहारी पदार्थ, मसाला पापड इत्यादी फॅटयुक्त मसालेदार पदार्थांचा समावेश कमी करावा. कारण या पदार्थांचे सेवन केल्यानंतर तुम्हाला डिहायड्रेटेड होऊ शकते. हे पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला पुन्हा पुन्हा तहान लागेल. हे डिहायड्रेशनचे लक्षण आहे.

हे पदार्थ खात राहा

उन्हाळ्यात उष्माघात टाळण्यासाठी काकडी सेवन करावे जेवणासोबत जास्त सॅलड घ्या. हिरवी मिरची आणि कच्चा कांदा देखील दररोज खावा. याशिवाय, शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी, ताक, नारळ पाणी, लिंबूपाणी, बडीशेपचा सरबत यांसारखे पेये आहाराचा भाग बनवावेत.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.