दर वर्षी आपण सर्व मातृदिन उत्साहात साजरा करतो.
या मातृदिनाची सुरुवात कोणी केली तुम्हाला माहित आहे का?
मातृदिनाची सुरुवात कोणी व कशी केली जाणून घ्या.
मातृदिनाची सुरुवात अमेरिकन समाज सुधारक अण्णा जार्विस यांनी केली.
1908 मध्ये. त्यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ आणि मातृत्वाच्या गौरवार्थ हा दिवस साजरा करण्याची कल्पना दिली.
त्यांनी 1912 पर्यंत "मदर्स डे इंटरनॅशनल असोसिएशन"ची स्थापना केली.
त्यानंतर 1914 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी मदर्स डेला राष्ट्रीय सुट्टी म्हणून घोषित केले.
अण्णा रीव्हस जार्विस यांनी सर्वात प्रथम त्यांच्या आईच्या प्रेमापोटी मातृदिनाची सुरुवात केली.
म्हणून आज सर्वत्र मातृदिन उत्साहात साजरा केला जातो.