Career in Sports: खेळाची आवड आहे पण दहावी बारावी नंतर काय? खास करियर ऑप्शन्स जे खेळाशी नातंही ठेवतील अन् जॉबही देतील
esakal May 13, 2025 01:45 AM

काही दिवसांपूर्वीच बारावीचा निकाल लागला. यानंतर आता दहावीच्या निकालाचीही प्रतिक्षा असून येत्या १३ मे रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या गेलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.

दहावी आणि बारावी हा कोणत्याही विद्यार्थ्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या टप्प्यानंतरही खऱ्याअर्थाने भविष्याच्या दृष्टीने पावले टाकले जातात. यावेळी विद्यार्थ्यांसोबतच पालकही पुढील दिशा शोधत असतात. यासाठी मार्गदर्शनही घेतात. आता विविध विषयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी करियरच्या वाटा उपलब्ध आहेत.

त्यातही अनेकांना खेळाची प्रचंड आवड असते. पण बऱ्याचदा खेळाडू म्हणून कारकिर्द घडवता येत नाही. मात्र, अशा विद्यार्थांनाही खेळाची आवड जपली जाऊ शकते, असे करियरचे पर्याय आता उपलब्ध आहेत. यातून विद्यार्थांना नंतर नोकरीच्या संधीही उपलब्ध होऊ शकतात.

खेळाडू बनण्यासाठी मेहनत, चिकाटी, योग्य प्रशिक्षण आणि योग्य संधीची गरज असते. सध्या भारतातही क्रीडा क्षेत्र मोठं होत आहे. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियासारख्या संस्था आहेत, खेलो इंडियासारखे विविध उपक्रम आहेत, ज्यातून खेळाडूंना तयार केले जाते. त्यांना भारत सरकारकडून मदतही केली जाते.

पण जे विद्यार्थी खेळाडू बनू शकत नाहीत, त्याच्यासाठी खेळाशी जोडलेले करियरचे कोणते पर्याय आहेत, हे थोडक्यात जाणून घेऊ.

डिप्लोमा कोर्स

डिप्लोमा इन स्पोर्ट्स मार्केटिंग, डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग, डिप्लोमा इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट, डिप्लोमा इन सायन्स अँ न्यूट्रिशन, असे डिप्लोमा कोर्स सध्या उपलब्ध आहेत. या डिप्लोमा कोर्सेचाचही विचार विद्यार्थी करू शकतात.

ग्रॅज्युएट कोर्स

क्रीडासंबंधित काही ग्रॅज्युएशन कोर्सही आहेत. यात बीएससी इन फिजिकल एज्युकेशन, बॅचलर ऑफ स्पोर्ट्स मॅनेटमेंट, स्पोर्ट्स सायन्स, बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट अशा काही कोर्सेसचा समावेश आहे.

पोस्ट ग्रॅज्युएशन

क्रीडासंबंधित काही पोस्ट ग्रॅज्युएशनचेही काही कोर्सेस आहेत. यामध्ये एमएससी इन फिजिकल एज्युकेशन, मास्टर ऑफ स्पोर्ट्स सायन्स, मास्टर ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स मेडिसिन, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट अँड बिझनेस अशा कोर्सेसचा समावेश आहे.

पीएचडी कोर्स

पीएचडी इन स्पोर्ट्स मॅनेजमेंट, पीएचडी इन फिजिकल एज्युकेशन, एमफिल इन फिजिकल एज्युकेशन असे काही पोस्ट ग्रॅज्युएशननंतरचेही कोर्सेस आहेत.

हे देखील कोर्सेस

या व्यतिरिक्त कॉमेंटेटर, ट्रेनर, स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर, क्रीडा पत्रकारिता, क्रीडा आहारतज्ञ, क्रीडा मानसशास्त्रज्ञ, स्पोर्ट्स ऍनालिस्ट, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच, स्पोर्ट्स मार्कटिंग, स्पोर्ट्स फोटोग्राफर, प्रशिक्षक, अंपायर यांसारखेही विविध कोर्सेस आणि परीक्षा आहेत.

स्पोर्ट्स ऍकेडमी
  • स्पोर्ट्स अथॉरेटी ऑफ इंडिया, बंगळुरू

  • इंस्पायर इंस्टिट्युट ऑफ स्पोर्ट्स, बेल्लारी

  • आर्मी स्पोर्ट्स इंस्टिट्यूट, पुणे

  • अंजू बॉबी जॉर्ज स्पोर्ट्स फाऊंडेशन, बंगळुरू

  • उषा स्पोर्ट्स ऑफ ऍथलेटिक्स, कोझीकोड

  • नेताजी सुभाष नॅशनन इंस्टिट्युट ऑफ स्पोर्ट्स, पटियाला

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.