शोभा डुंबरे यांचा सेवापूर्ती सत्कार
esakal May 13, 2025 04:45 AM

आपटाळे, ता. १२ : घंगाळदरे (ता. जुन्नर) येथील अंगणवाडी कार्यकर्ता शोभा पाटीलबुवा डुंबरे यांचा सेवापूर्ती निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात आला. रविवारी (ता. ११) या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शोभा डुंबरे यांनी ४४ वर्ष एवढी प्रदीर्घ सेवा अंगणवाडी सेविका व कार्यकर्ता म्हणून बजावली. याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी मनोगतातून शोभा डुंबरे यांच्या सेवेचे कौतुक केले. यावेळी लोकनियुक्त सरपंच संतोष तळपे, पोलिस पाटील नितीन तळपे, पेसा अध्यक्ष कैलास तळपे, उपसरपंच संजय रावते, सदस्य नारायण विरनक, महेंद्र तळपे, संदीप उघडे यांसह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. सुनील विरणक यांनी नियोजन केले. रामदास तळपे यांनी आभार मानले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.