धामोडला आज,
उद्या कबड्डी स्पर्धा
धामोड : कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मंगळवारी (ता. १३) व बुधवारी (ता. १४) येथील सह्याद्री क्रीडा मंडळाच्या वतीने ६० किलो वजनी गटातील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले आहे. विजेत्यांना अनुक्रमे १५ हजार एक, १० हजार एक व ७ हजार एक रुपये अशी बक्षिसे आहेत. स्पर्धा येथील केंद्रशाळेच्या मैदानावर होणार आहे.