पवनानगर, ता.१३ : दहावीच्या परीक्षेत पवनानगर केंद्रावर विविध शाळांमधून मुलींनीच बाजी मारली. पवनानगर, शिवली, शिवणे व जवण शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. पवना विद्या मंदिराची विद्यार्थिनी पूर्वा घरदाळे हिने (९२.२० टक्के) केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळविला.
सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच केंद्रातील मुख्याध्यापक भाऊसाहेब आगळमे, दत्तात्रेय जाधव, रमेश अरगडे, नामदेव गाभणे, गणपत कायगुडे, संजय ओव्हाळ, शशिकांत जाधव, जनार्दन बोरोले यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.
केंद्रातील सर्व शाळांचा निकाल व टक्केवारी पुढील प्रमाणे ः पवना विद्या मंदिर, पवनानगर - १०० टक्के
पूर्वा घरदाळे (९२.२०), पायल डोंगरे (९०.२०), वेदांतिका सावंत (९०).
श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, शिवली- भडवली ः १०० टक्के. कार्तिकी घारे (९०.४०),
जान्हवी दळवी (८६.८०), सृष्टी वरघडे (८५.८०), श्री ज्ञानेश्वर विद्यानिकेतन, जवण - १०० टक्के. संस्कृती केदारी (८७.६०), निधी कडू (८६.४०), वेदिका गोणते (८४.८०).
श्री संत तुकाराम विद्यालय, शिवणे ः १०० टक्के. आदित्य गराडे (९०.२०), नंदन शिंदे (८९), प्रतीक्षा कारके (८२.४०). श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, बौर ः ९८ टक्के. समीक्षा जगदाळे (८६.८०), दीपांजली वाळुंजकर (७७.८०), सार्थक दाभाडे (७४.२०). श्री संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, राजेवाडी, दिवड ः ९६.१५ टक्के.
वैष्णव लोखारे (८८.४०), कार्तिक सावळे (८५.६०), समीक्षा राजीवडे (७६.४). माध्यमिक विद्यालय, करूंज ः ९६.२९ टक्के. सायली दहिभाते (८५.४०), तनुजा लगड (७८), संजीवनी लगड (७६.२०). वारु कोथुर्णे माध्यमिक विद्यालय, वारु (कोथुर्णे) - ९०.४७ टक्के. संध्या निंबळे (७१.२०), दीक्षा निंबळे (६८.८०), यश बेनगुडे (६५.२०).
पूर्वा शशिकांत घरदाळे