पनवेल महापालिकेत बुद्ध जयंती साजरी
esakal May 13, 2025 11:45 PM

पनवेल, ता. १३ (बातमीदार) : बुद्धपौर्णिमेनिमित्त पनवेल येथील आंबेडकर भवनमध्ये सोमवारी (ता. १२) महापालिकेच्या वतीने तथागत गौतम बुद्धांना अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धांमध्ये महापालिका कार्यक्षेत्रातील व बाहेरील सुमारे दोन हजार ६७२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये यशस्वी झालेल्या २००हून अधिक विद्यार्थ्यांना या वेळी बक्षिस वितरण करण्यात आले. तसेच आंबेडकर भवनातील स्पर्धा परीक्षेचा सलग १८ तास अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या वेळी सन्मानित करण्यात आले. या वेळी आमदार आमदार प्रशांत ठाकूर, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, उपायुक्त अभिषेक पराडकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, माजी महापौर कविता चौतमोल, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माजी नगरसेवक ॲड. प्रकाश बिनेदार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.