वाशिम शहरातील पाटणी चौक परिसरात येत असलेल्या भागात अतिक्रमाचा हातोडा आज दुसऱ्या दिवशी सुरूच होता.
या परिसरात येत असलेल्या बालाजी संकुल,भाजी मार्केट या ठिकाणच् आज अतिक्रमण काढण्यात आलं.
सकाळपासूनच ही कारवाई सुरू केली होती. या ठिकाणच्या खुल्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे.
Kalyan Live : कल्याण पूर्वेकडील पूना लिंक रोड अपघाताचा हॉट स्पॉटकल्याण पूर्वेकडील पूर्ण लिंक रोडवर चक्की नाकाच्या दिशेने जाणारा डंपरचे नियंत्रण सुटल्याने डंपरने थेट डिव्हायडरला धडक दिली . सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही . या अपघातात या अपघातात डिव्हायडरवरील लाईटचा पोल कोसळला आहे. डंपर चालकाचे डंपर वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे.
Live : विदर्भात सोने-चांदीच्या दुकानावर आयकर विभागाची छापेमारीपश्चिम विदर्भातील अमरावती,अकोला , यवतमाळ आणि परतवाडा मधील सोन्या चांदीच्या दुकानावर आयकर विभागांची छापेमारी..
पूनम ज्वेलर्स, प्रकाश ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स , अमरावती मधील एकता ज्वेलर्स वर आयकर विभागाची छापीमारे सुरू असल्याची माहिती..
सोन्या चांदीच्या दुकानावर आयकर विभागाचे सकाळपासून छापीमारीचे सत्र.
Pune Live : पुण्याच्या मार्केटमध्ये तब्बल अडीच किलोचा एक आंबा...मार्केट हातात तब्बल अडीच किलो एकांबा असलेल्या आंब्याच्या झाले आहे आंबा अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र बनला आहे
कर्नाटकातून दाखल झालेल्या या आंब्याच्या किलोला 60 ते 70 रुपये भाव मिळाला आहे
फळबाजारातील डी. बी. उरसळ अॅण्ड सन्स फर्मवर ही आवक झाली. कर्नाटकात या आंब्याला खुदादाद या नावाने ओळखले जाते.
Kolhapur : अंबाबाई मंदिरात एटीएएस पथकाकडून पाहणीभारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिरात पुणे आणि कोल्हापूर एटीएस पथकाकडून पाहणी करण्यात आली. मंदिर, मंदिर परिसर आणि सीसीटीव्ही रूममधून प्रत्येक गोष्टीची माहिती घेतली जात आहे.
BSF Jawan : पाकिस्तानने ताब्यात घेतलेला जवान भारताकडे सोपवलाअनावधानाने सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये गेलेल्या आणि पाकिस्तानने ताब्यात घेतलेल्या बीएसएफ जवानाला भारताकडे सोपवण्यात आलंय. अट्टारीतील चेकपोस्टवरून भारताकडे सकाळी साडे दहाच्या सुमारास सोपवल्याची माहिती समोर येत आहे.
Pune : पुण्यात बाणेरमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेटपुण्यात बाणेर परिसरातील चार स्पा सेंटरला पोलिसांनी टाळं ठोकलंय. स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवणाऱ्या बापलेकाला पोलिसांनी अटक केलीय. स्पाच्या नावा खाली हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवलं जात होतं.
राज शिष्टाचाराचं उल्लंघन करून मुख्यमंत्र्यांना भेटले, दोन अधिकाऱ्यांचे निलंबनराज शिष्टाचाराचं उल्लंघन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मुख्यालयात राहण्याचे आदेश दिले असतानाही ते डावलल्याचा आरोप अधिकाऱ्यांवर आहे.
Delhi Live : न्या. भूषण गवई यांनी सरन्यायाधीशपदाची घेतली शपथसुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांनी घेतली शपथ. राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी 52 व्या सरन्यायाधीशांना दिला शपथ.
J&K Live : चिनाब नदीवरील बगलिहार जलविद्युत प्रकल्प धरणाचे सर्व दरवाजे बंदजम्मू आणि काश्मीर मधील रामबनमधील चिनाब नदीवर बांधलेल्या बगलिहार जलविद्युत प्रकल्प धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
Malegaon Live : पाकिस्तानच्या वेबसाईट सर्च करणारा तरुण एसटीएसच्या ताब्यातभारत पाकिस्तान तणावा दरम्यान पाकिस्तानच्या वेबसाईट्स सर्च करणाऱ्या मालेगावमधील युवकाला एटीएसने ताब्यात घेतले आहे.
Operation Sindoor : हज यात्रेकरूंचा दुसरा जथ्था हज हाऊस श्रीनगरहून विमानतळाकडे रवानाजम्मू आणि काश्मीर : हज यात्रेकरूंचा दुसरा जथ्था हज हाऊस श्रीनगरहून विमानतळाकडे रवाना झाला. भारत-पाकिस्तान यांच्यातील समझोत्यानंतर ते मक्का, सौदी अरेबियाला रवाना होत आहेत. श्रीनगरहून हज यात्रेकरूंचा पहिला जथ्था ४ मे २०२५ रोजी रवाना झाला आहे.
Kankavli Nagar Panchayat : कणकवलीत उघड्यावर कचरा टाकल्यास दंड, मुख्याधिकाऱ्यांचा इशाराकणकवली : कणकवली शहर तसेच बाजारपेठेत कचरा टाकताना आढळून आल्यास विक्रेते, व्यापारी तसेच स्थानिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा नगरपंचायतीने दिला आहे. दोन दिवस शहरात पसरलेल्या कचऱ्याची पाहणी केल्यानंतर मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी आज हे आदेश दिले.
Mumbai-Pune Highway : चाकण फाट्यावर नाकाबंदीवरील वाहतूक पोलिसाला ट्रकने चिरडलेतळेगाव स्टेशन : मुंबई-पुणे महामार्गावर छत्रपती संभाजी महाराज चौकात चाकण फाट्यावर पोलीस नाकाबंदी चालू असताना मंगळवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास एका ट्रकने कर्तव्यावरील पोलिसाला चिरडले. मिथून धेंडे (वय ४१, उरुळी कांचन, पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. अपघातानंतर ट्रकचालक चाकण एनआयडीसीतील वाहनतळावर ट्रक पार्किंग करुन फरार झाला.
Weather Update : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे अंदमानात आगमन, हवामान विभागाने दिली माहितीपुणे : नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) मंगळवारी अंदमानात आगमन झाले आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
Mahavitaran Engineer : महावितरण अभियंत्याला इचलकरंजीत लाच घेताना पकडलेइचलकरंजी : येथील एका अपार्टमेंटमध्ये १८ वीज जोडण्या देण्यासाठी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला ३० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. प्रशांत ताराचंदजी राठी (वय ४९, रा. उपकार रेसिडेन्सी, सांगली रोड, इचलकरंजी, मूळ रा. धामणगाव, ता. धामणगाव, जि. अमरावती) असे त्यांचे नाव आहे.
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या 'रेझिस्टन्स फ्रंट'चा प्रमुख शाहिद कुट्टे ठारजम्मू : गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर भारतीय जवानांनी आज जम्मू-काश्मीरमधील शोपियाँमध्ये केलेल्या कारवाईत तीन दहशतवादी मारले गेले. यापैकी दोघे जण लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचे सदस्य असून तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटलेली नाही. मात्र, हा दहशतवादी म्हणजे पहलगाम हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणाऱ्या ‘द रेझिस्टन्स फ्रंट’ या संघटनेचा प्रमुख शाहिद कुट्टे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Ambabai, Jyotiba Temple : अंबाबाई, जोतिबा मंदिरात पारंपरिक वेशभूषेतच प्रवेश, आजपासून होणार निर्णयाची अंमलबजावणीकोल्हापूर : येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई व जोतिबा मंदिरात आता भाविकांना पारंपरिक वेशभूषेतच प्रवेश देण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला आहे. आज (ता. १५) पासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मंदिर परिसरात काही भाविक तोकड्या कपड्यांत प्रवेश करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.
Bhushan Gavai : सर्वोच्च न्यायालयाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. भूषण गवई आज कार्यभार स्वीकारणारनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. भूषण गवई हे आज (ता. १४) कार्यभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. महाराष्ट्रीय असलेले गवई हे अनुसूचित जातींचे प्रतिनिधित्व करणारे दुसरे सरन्यायाधीश ठरणार आहेत. या वर्गाचे प्रतिनिधित्व करण्याचा पहिला बहुमान आधी सरन्यायाधीश न्या. के. जी. बालकृष्णन यांना मिळाला होता. २००७ ते २०१० याकालावधीत त्यांनी काम पाहिले होते. न्या. गवई यांना सहा महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.
PM Modi : 'दहशतवादाविरोधात लक्ष्मण रेषा आखलीये, आता पुन्हा हल्ला झाल्यास सडेतोड प्रत्युत्तर देऊ' -पंतप्रधान नरेंद्र मोदीLatest Marathi Live Updates 14 May 2025 : ‘‘दहशतवादाविरोधात आम्ही लक्ष्मण रेषा आखली असून आता पुन्हा हल्ला झाल्यास सडेतोड प्रत्युत्तर देऊ. ऑपरेशन सिंदूर ही आमच्यासाठी सामान्य स्थिती आहे. पाकिस्तानमध्ये कोठेही दहशतवादी शांततेत राहू शकणार नाहीत, घरामध्ये घुसून त्यांना ठेचले जाईल.’’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा पाकिस्तानचे वाभाडे काढले. तसेच व्यापार रोखण्याच्या धमकीमुळेच भारत पाकिस्तानचा संघर्ष थांबला हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा भारताने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. कोल्हापूर येथील करवीर निवासिनी श्री अंबाबाई व जोतिबा मंदिरात आता भाविकांना पारंपरिक वेशभूषेतच प्रवेश देण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे घेण्यात आला आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून न्या. भूषण गवई हे आज कार्यभार स्वीकारणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. नैॡत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) मंगळवारी अंदमानात आगमन झाले आहे. दक्षिण बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्रात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..