Operation Sindoor : ‘घाबरलेल्या कुत्र्यासारखी पाकिस्तानची हालत…’, अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याने PAK ची इज्जतच काढली
GH News May 15, 2025 12:09 PM

पेंटागनचे माजी अधिकारी आणि अमेरिकन एंटरप्राइज इंस्टीट्यूटचे वरिष्ठ फेलो मायकल रुबिन यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरच विश्लेषण केलं आहे. मायकल रुबिन यांच्यानुसार, भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत जी कारवाई केली, त्यामुळे पाकिस्तानला कूटनीतिक आणि सैन्य आघाडीवर मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानच्या भूमिकेवर कठोर प्रहार केला. भारताच्या लष्करी कारवाईच त्यांनी भरभरुन कौतुक केलं.

“पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने त्वरित आणि अचूकतेने दहशतवाद्यांच्या ठिकाणावर प्रहार केले. त्याने पाकिस्तानच्या दहशतवादाच्या जाळ्याकडे लक्ष वेधल गेलं. पाकिस्तानच खोटं पुन्हा एकदा जगासमोर आलं” असं रुबिन यांनी सांगितलं. “भारताने या संघर्षात सैन्य आणि कूटनितीक दोन्ही आघाड्यांवर पाकिस्तानवर मात केली. पाकिस्तानकडून दहशतवादाला जो आश्रय दिला जातो, त्याकडे सगळ्या जगाचं लक्ष आहे, हा भारताचा कूटनितीक विजय आहे” असं रुबिन म्हणाले.

पाकिस्तानी सैन्य ठिकाणं आणि एअरबेसला लक्ष्य

त्यांनी सांगितलं की, 7 मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला. यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. त्यानंतर पाकिस्तानने प्रतिहल्ल्याचा प्रयत्न केला. पण भारताने त्यांना फक्त उत्तरच दिलं नाही, तर अनेक पाकिस्तानी सैन्य ठिकाणं आणि एअरबेसला लक्ष्य केलं.

तिथेच फरक संपला

“पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांमधील संबंध या ऑपरेशनमुळे संपूर्ण जगासमोर उघडे झाले आहेत” असं रुबिन म्हणाले. पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी सैन्य पोषाखात येऊन दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होतात, तेव्हा कोण दहशतवादी आणि कोण फौजी? हा फरक संपून जातो” असं रुबिन यांनी म्हटलय.

‘एक घाबरलेल्या कुत्र्यासारखी हालत’

रुबिन यांनी पाकिस्तानसाठी अत्यंत कठोर शब्द वापरले. “या चार दिवसाच्या लढाईत पाकिस्तानची हालत एक घाबरलेल्या कुत्र्यासारखी झाली होती. जो फक्त सीजफायरची भीक मागत होता. पाकिस्तान हा पराभव आता लपवू शकत नाही. वाईट पद्धतीने त्यांचा पराभव झालाय” असं रुबिन म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.