सध्या पाकिस्तानच्या किराना हिल्सची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. किराना हिल्स येथे पाकिस्तानचा अणवस्त्र साठा असल्याच बोललं जातय. सध्या तिथे कसलीतरी गळती, लीकेज झाल्याची सोशल मीडियावर खूप चर्चा आहे. वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. भारताने मागच्या आठवड्यात पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करुन तिथले वेगवेगळे एअर बेस उडवून दिले होते. भारत आणि पाकिस्तान दोन्ही अणवस्त्र संपन्न देश आहेत. पाकिस्तानकडून सतत अणवस्त्रांची धमकी दिली जायची. भारताने तीन दिवसांच्या सैन्य कारवाईत पाकिस्तानचा हा भ्रम पूर्णपणे मोडून काढला. उद्या एखाद्या देशाने अणवस्त्र हल्ल्याचा निर्णय घेतला, तर अणूबॉम्ब सक्रीय करुन लॉन्च करण्यासाठी एक ठराविक कालावधी लागतो. अणवस्त्र हल्ला करण्याची एक प्रोसेस असते. अमेरिका-रशियाच्या तुलनेत भारत-पाकिस्तानला परस्परांवर अणवस्त्र लॉन्च करायला किती वेळ लागेल? ते समजून घ्या.
अमेरिका
किती वेळ लागेल : 4 ते 5 मिनिट (लॉन्चच्या आदेशानंतर)
अमेरिकेकडे जगातील सर्वात अत्याधुनिक अणवस्त्र कमांड अँड कंट्रोल प्रणाली आहे. राष्ट्राध्यक्षांच्या आदेशानंतर मिनटमॅन ICBM काही मिनिटात लॉन्च होईल. पाणबुडी आधारित मिसाइल्सना लॉन्च करण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागतील. अमेरिकेच्या “लॉन्च-ऑन-वॉर्निंग” नीतीमुळे धोक्याच्या स्थितीत त्वरित प्रतिक्रिया देता येते.
तैनाती : अमेरिकेकडे जमीन, समुद्र (पाणबुडी) आणि हवाई (बॉमबवर्षक) आधारित शस्त्र आहेत.
रशिया
किती वेळ लागेल : 4 ते 10 मिनट
प्रोसेस :रशियाची अणवस्त्र प्रणाली अत्याधुनिक आहे. रशियाकडे ‘डेड हँड’ सारखी स्वयंचलित प्रणाली आहे. ही सिस्टिम प्रत्युत्तर देते. रशियाकडे ICBM सारखी क्षेपणास्त्र आहेत. सरमत मिसाइल काही मिनिटात लॉन्च होऊ शकतं. पाणबुडी आणि मोबाईल लॉन्चरवरुन थोडा जास्त वेळ लागेल. रशियाची रणनिती त्वरित प्रतिक्रियेवर केंद्रीत आहे.
तैनाती : रशियाकडे जगातील सर्वात मोठा अणवस्त्रसाठा आहे. (जवळपास 5,977 शस्त्र) आहेत. यातील बहुतांश तैनात स्थितीमध्ये आहेत.
भारत
किती वेळ लागेल : 30 मिनिटं ते काही तास
प्रोसेस : भारताच अणवस्त्र धोरण “नो फर्स्ट यूज”च आहे. भारताची अणवस्त्र तैनात स्थितीमध्ये नसतात. अणवस्त्र मिसाइल्सना सक्रीय करण्यासाठी असेंबली आणि इंधन भरण्याची गरज पडू शकते. अग्नि मिसाइल आणि पाणबुडी आधारित K 4 मिसाइल्सना लॉन्चिंगसाठी वेळ लागू शकतो. भारताच्या कमांड प्रणालीत सिविलियन आणि सैन्य नेतृत्वात समन्वय आवश्यक आहे.
तैनाती : भारताकडे जवळपास 172 अणवस्त्र आहेत, त्यातली बहुतांश जमीन आणि समुद्र आधारित आहेत.
पाकिस्तान
किती वेळ लागेल : 30 मिनिट ते काही तास
प्रोसेस : पाकिस्तानची अणवस्त्र रणनिती भारत केंद्रीत आहे. यात त्वरित प्रतिक्रियेची क्षमता आहे. पाकिस्तानची अणवस्त्र तैनात स्थितीमध्ये नाहीत. मिसाईल्स उदहारणार्थ घौरी आणि शाहीन यांना सक्रीय करण्यासाठी वेळ लागू शकतो. सैन्य नेतृत्वाच केंद्रीकृत नियंत्रणामुळे प्रक्रियेचा वेग मंदावू शकतो.
तैनाती : पाकिस्तानकडे जवळपास 170 शस्त्र आहेत. ती मुख्यत्वे जमीन आधारित आहेत.