वाढत्या नागरिकरणावर आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलीस यंत्रणा अपुरी पडत असून पोलीस खात्यात भरती करण्याची मागणीही गृहखात्याकडे केली जाते. दरम्यान, आता वाढत्या गुन्हेगारीच्या आणि अपुऱ्या पोलीस मनुष्यबळाच्या पार्श्वभूमीवर गृहखात्याने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल यांना गुन्ह्याचा तपास करण्यात अधिकार गृह विभागाने दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून राजपत्र जारी करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
Ramdas Athvale : एनडीएला पाठिंबा देत असतील तर शरद पवार यांचे स्वागतचगेल्या काही दिवसांपासून मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र येतील, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि अजित पवार गट देखील एकत्र येण्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार एकत्र येत असतील तर मला आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र यावे लागेल, असे त्यांनी म्हटले आहे. शरद पवार आमच्या सोबत आले असते तर या देशाचे ते राष्ट्रपती होऊ शकले असते, आताही शरद पवारांचे स्वागतच आहे, असेही रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
15-20 दिवस पुढे मागे होईल, पण निवडणुका सुप्रीम कोर्टाने ठरवून दिलेल्या वेळेतच होतील!पाऊस जास्त असेल तिथे 15-20 दिवस पुढे मागे होऊ शकते, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या वेळेतच होतील, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
पुण्यातील चाकणमध्ये एमडी ड्रग्जची खुलेआम विक्रीपुण्यातील चाकणमध्ये एमडी ड्रग्जची खुलेआम विक्री होत असल्याचे समोर आले आहे. चाकण पोलिसांच्या तपासानंतर या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. या प्रकरणाची टीप देणाराचा मास्टरमाईंड निघाला आहे.
पुण्यातील चाकणमध्ये एमडी ड्रग्जची खुलेआम विक्री वाचाळ मंत्र्यांच्या तपासावर हायकोर्टाची नाराजी; पोलिसांनाही फटकारलं!वाचाळ मंत्री विजय सिंह यांच्या तपासावर मध्य प्रदेश हायकोर्टाने नाराजी व्यक्त केली आहे. एफआयआर बघता योग्य तपास होईल असे वाटत नसल्याचे म्हणत आपण स्वतः या प्रकरणाच्या चौकशीवर लक्ष ठेवणार आहोत, असे कोर्टाने स्पष्ट केले.
त्यांनी आमच्या माथ्यावर हल्ला केला, आपण त्यांची छाती फाडली!पाकिस्तानने दहशतवादी हल्ला करून आमच्या माथ्यावर हल्ला केला. आमच्या माता-भगिनींचे सिंदूर पुसले. आपण घरात घुसून त्यांची छाती फाडली, अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सैन्याच्या कारवाईचे कौतुक केले.
Gokul Dudh Sangh Live : 'गोकुळ'च्या बैठकीला डोंगळे यांनी मारली दांडीकोल्हापूर जिल्ह्याचे राजकीय आणि आर्थिक केंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या हालचाली सुरु आहे. आज गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे हे राजीनामा देणार होते. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता गोकुळ दूध संघावर महायुतीचाच अध्यक्ष असावा, या दृष्टिकोनातून गोकुळ दूध संघातील अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ नये अशा सूचना संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांना वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहेत. आज बैठकीला डोंगळे यांनी दांडी मारली. महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार आपण राजीनामा देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत सरकारनामाने बुधवारी वृत्त दिले होते. या वृत्तावर शिक्कामोर्तब झाले.
Arun Gawli News: अरुण गवळीला दिलासा,गुन्हेगार अरुण गवळीवर अनेक गुन्हे दाखल आहेत. मुंबई (Mumbai) मधील शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या खून प्रकरणात तसेच इतर गुन्ह्यांमध्ये गवळीला दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली आहे. जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अरूण गवळीला काहीसा दिलासा मिळाला आहे. त्याची 2008 सालच्या खंडणी प्रकरणातून विशेष मोक्का न्यायालयाने बुधवारी निर्दोष सुटका केली आहे.
जम्मू-कश्मीरमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठारजम्मू-कश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. या सर्च ऑपरेशनमध्ये जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा येथील त्रालमध्ये गुरुवारी सकाळी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार मारले. अजून एक दहशतवादी लपून बसल्याची माहिती असून जवान त्याचा शोध घेत आहेत.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह जम्मू कश्मीर दौऱ्यावरभारत पाकिस्तान शस्त्रसंधीनंतर देखील सीमेवर तणाव दिसून येत आहे. भारतीय सीमेत घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे. सीमेवर तणावाचे वातावरण असताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आज जम्मू कश्मीरच्या दौऱ्यावर येत आहेत.
तुळजाभवानी मंदिरात गैरप्रकार करणाऱ्या पुजाऱ्यांवर बंदीतुळजाभवानी मंदिरात गैरप्रकार करणाऱ्या पुजाऱ्यांवर मंदिर संस्थानचे कडक कारवाई केली आहे. विशेष म्हणजे गेल्या 6 महीन्यात तब्बल 12 पुजाऱ्यांवर मंदिर बंदी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.तुळजाभवानी मंदिरात गर्दीचा कालावधीत दर्शन रांगेत घुसखोरी करणे, गाभाऱ्यात घुसखोरी करणे यासह विविध गैरप्रकारात दोषी पुजाऱ्यांवर मंदिर संस्थान नोटीसा बजावत खुलासा मागते व खूलासा समाधानकारक नसल्यास पुजाऱ्यांवर मंदिर बंदीची कारवाई करण्यात येते.