भारतीय महिला आणि पुरुष संघ पुढच्या महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटीतून निवृत्ती घेतल्याने कर्णधारपदासाठी नव्या नावाचा विचार होत आहे. त्यामुळे संघ जाहीर करण्यास उशीर होत आहे. 23 मे रोजी भारतीय संघाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भारतीय महिला संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय महिला संघ इंग्लंडमध्ये वनडे आणि टी20 मालिका खेळणार आहे. पाच सामन्यांची टी20 मालिका आणि 3 सामन्यांची वनडे मालिका असणार आहे. भारतीय महिला संघ 28 जून ते 22 जुलै दरम्यान इंग्लंडविरुद्ध पाच टी20 आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. टी20 मालिका 28 जूनपासून सुरु होणार आहे. तर वनडे मालिका 16 जुलै ते 22 जुलै दरम्यान असणार आहे. या दोन्ही संघाची धुरा हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर आहे.
हरमनप्रीत कौरला दोन्ही संघांचे कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तर स्मृती मंधाना हीच्याकडे दोन्ही फॉरमेटमध्ये उपकर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.
वनडे मालिकेसाठी भारतीय वुमन्स संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया, तेजल हसबनीस, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुची उपाध्याय, अमनज्योति कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे
टी20 मालिकेसाठी भारतीय वुमन्स संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (विकेटकीपर), यास्तिका भाटिया (विकेटकीपर), हरलीन देओल, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरणी, शुची उपाध्याय, अमनज्योत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, सायली सातघरे