-Rat१५p९.jpg-
२५N६३९२६
मंडणगड : तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्याकडे निवेदन देताना रिपाइं तालुका शाखेचे पदाधिकारी.
---------
गरोदर मातेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करा
रिपाइं आठवले गट ः मंडणड ग्रामीण रुग्णालयाबाबत निवेदन
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. १५ ः मंडणगड ग्रामीण रुग्णालयाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे एका गरोदर मातेस तिच्या बाळासह प्राणास मुकावे लागले. या घटनेची चौकशी करून संबंधितांविरोधात कारवाई करण्यात यावी तसेच रुग्णालयाच्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे सेवा मिळत नसल्याने यावर उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) मंडणगड तालुका शाखेने तहसीलदार अक्षय ढाकणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
ग्रामीण रुग्णालय येथे गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णांना योग्य त्या वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत. १०८ व १०२ या रुग्णवाहिकांची वेळेवर उपलब्धता होत नाही. इंधनाशिवाय रुग्णवाहिका सेवा व इतर सेवा ठप्प राहात असल्याने तालुक्यातील गोरगरीब रुग्णांचे हाल होत आहेत. याबाबत अनेकवेळा ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला प्रत्यक्ष भेटून विचारणा करूनही सुधारणा होत नाही. ढिसाळ व्यवस्थापनामुळे १० मे रोजी एका गरोदर मातेला तिच्या बाळासह प्राणास मुकावे लागले. या घटनेची चौकशी करून घटनेस व ढिसाळ व्यवस्थापनास जबाबदार असणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आदेश मर्चंडे, विजय खैरे, विजय पवार, सुरेश तांबे, विधान पवार, गौरव मर्चंडे, प्रकाश जाधव, आदींच्या सह्या आहेत.